Shani Gochar : 2025 पर्यंत ‘या’ राशीच्या लोकांवर होणार महाधनलाभ! शनिदेव देणार बक्कळ पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Gochar 2023 in Kumbh : ग्रहांमधील न्यायदेवता आणि कर्माचा दाता शनिदेवाचं नाव घेतलं की चांगल्या चांगल्या माणसाला घाम फुटतो. शनिदेव हा जाचकाला कर्माचं फळ देतो, त्याची साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ ठरतो. अशात जेव्हा शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तो 12 राशींवरही त्यांचा परिणाम दिसून येतो. (saturn transit in aquarius till 2025 will shower money and give big success these 3 zodiac signs)

तब्बल 30 वर्षांनी शनिदेवाने जानेवारी 2023 मध्ये स्वगृही म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता तो 2025 पर्यंत कुंभ राशीत विराजमान असणार आहे. कुंभ राशीतील शनिची स्थिती ही जाचकाच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणणार आहे. शनिदेव फक्त त्रासदायक नाही तर शनिदेवाच्या कृपेने तीन राशींच्या लोकांसाठी तो सकारात्मक आणि आश्चर्यकारक परिणाम देणार आहे. या लोकांना 2025 पर्यंत बक्कळ पैसा मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी…

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी शनी गोचर अतिशय भाग्यशाली ठरणार आहे.  या लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होणार असून त्यामुळे तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. कर्जाचं डोंगर तुमच्या खांद्यावरुन उतरणार आहे. व्यापारी वर्गाला शनी गोचर फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असणार आहे. 2025 पर्यंत तुम्हाला एकापाठोपाठ एक मोठे यश मिळणार आहे. कोणतेही मोठे स्वप्न शनिदेव पूर्ण करणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनी गोचर अतिशय शुभ ठरणार आहे.  खूप दिवसांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती तुम्हाला यश मिळवून देणार आहे. तुमच्या कामात यश आणि चांगले परिणाम तुम्हाला देणार आहे. व्यवसायिकांसाठी प्रगतीचा मार्ग सुरु झाला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होणार आहे. उत्पन्न वाढल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. नवीन नोकरीची संधी आहे. त्याशिवाय गाडी आणि मालमत्ता खरेदी योगही तुमच्या कुंडलीत तयार झाले आहेत. जोडीदाराबरोबर नातं मजबूत होणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण वरदान ठरणार आहे. कारण शनीदेव स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशीच्या लोकांना शनीची साडेसती चालू असली तरी कुंभ राशीचा स्वामी शनि असल्याने  या राशीच्या लोकांना साडेसातीच्या काळातही लाभ होणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. कोर्ट केसेस तुमच्या बाजूने लागेल. कोणतीही महत्त्वाची प्रलंबित कामं सहज पूर्ण होणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts