Weather Forecast : कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : महाराष्ट्रासह देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही देशातील काही भागांत मुसळधार तर काही भागांत रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. राज्यासह देशभरात काही ठिकाणी 25 ते 28 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

देशात ठिकठिकाणी जोरदार पाऊस

कोकण आणि गोव्यात 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. विजांच्या गडगडाटात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने वायव्य भारतात गडगडाटी वादळासह हलक्या ते व्यापक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात. पश्चिम भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट अपेक्षित होता.

’या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आयएमडी (IMD) ने वर्तवतलेल्या अंदाजानुसार, 27 आणि 28 सप्टेंबरला महाराष्ट्र, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांत देशातील उर्वरित भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाची शक्यता

IMD नं सांगितलं की, “रविवारी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मराठवाड्यात 27 सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रविवारी गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात प्रदेशातही विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

नागपुरात पावसाचा कहर

नागपुरात पावसाने कहर केला आहे. आतापर्यंत 400 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. शनिवारी तीन तासांत 109 मिमी पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला. परिसरात सध्या मदतकार्य सुरू आहे. हवामान खात्याने या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 26 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे.

’या’ भागातही येलो अलर्ट जारी

हवामान खात्याने 25 आणि 26 सप्टेंबरला अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

[ad_2]

Related posts