[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) ने चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे लँडर लँडर (Lander Vikram) आणि रोव्हर प्रज्ञान (Rover Pragyan) जागे होण्याची वाट पाहत आहेत. इस्रोने विक्रम लँडर (Vikram Lander) आणि प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) स्लीप मोडमध्ये गेले होते. आता इस्रो चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर ॲक्टिव्ह मोडमध्ये येण्याची वाट पाहत आहेत. लँडर आणि रोव्हर स्लीप मोडमध्ये गेल्यावर इस्रोने ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. यावेळी इस्रोने 22 सप्टेंबरला लँडर आणि रोव्हर जागे होण्याचा अंदाज वर्तवला होता.
लँडर आणि रोव्हर संपर्क कधी होणार?
चंद्रावर 22 सप्टेंबर रोजी पुन्हा दिवस सुरू झाला. त्यामुळे सौर पॅनेल सूर्यप्रकाशाने चार्ज होऊन लँडर आणि रोव्हर पुन्हा काम सुरु करणं अपेक्षित आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. चंद्रावर सूर्यकिरणे आल्यानंतर लँडर आणि रोव्हर ॲक्टिव्ह होतील, अशी इस्रोला अपेक्षा आहे. रोव्हर आणि लँडरचे सोलर पॅनेल चार्ज झाल्यानंतर दोन्ही पुन्हा इस्रोच्या संपर्कात येतील, असं इस्रोनं सांगितलं आहे. इस्रोच्या चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली, त्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरुन तेथील माहिती गोळा केली आणि त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोघेही स्लीप मोडमध्ये गेले.
संपर्क करण्याचा ISRO चा प्रयत्न
चंद्रावर दिवस सुरु झाल्यानंतर स्लीप मोडमधील म्हणजेच झोपलेले लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान जागे होतील, असं याआधी इस्रोने सांगितलं होतं. 22 सप्टेंबर रोजी चंद्रावर सु्र्योदय झाला. त्यानंतर आता इस्रो लँडर आणि रोव्हर जागे होण्याची वाट पाहत आहेत. चंद्रावर दिवस सुरु झाला असून इस्रो विक्रम आणि प्रज्ञानच्या सिग्नलची वाट पाहत आहेत. इस्रोने सांगितलं आहे की, चंद्रावर रात्र होईपर्यंत इस्रो सिग्नलची वाट पाहत राहील. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवर 14 दिवसांचा असतो. त्यामुळे आता इस्रो विक्रम आणि प्रज्ञान ॲक्टिव्ह होण्याची वाट पाहत आहेत.
इस्रो प्रमुखांचा खास मेसेज
इस्रो प्रमुखांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, इस्रोच्या ट्विटर अकाऊंटवरून आज एक व्हिडीओ जारी करून इस्रोच्या प्रमुखांनी भारतीयांना संदेश दिला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘भारत चंद्रावर पोहोचला आहे. चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग साजरा करूया. MyGov वर #Chandrayaan3MahaQuiz मध्ये भाग घ्या. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, MyGov हे एक व्यासपीठ आहे, जिथे तुम्ही स्पेस क्विझ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विसरू नका, या स्पर्धेत सहभागी होऊन आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला प्रेरणा द्या.’
[ad_2]