Return Rain In India Monsoon Withdrawal Started From Northwest Rajasthan Monsoon Update News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : कुठे अधिक तर कुठे कमी पाऊस (Monsoon) अशी परिस्थिती असताना, आता नैऋत्य मान्सून (Rain) देशातून माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. आज वायव्य राजस्थानातून मान्सून माघारी फिरला. मागील 5 दिवसांपासून वायव्य (Northwest) राजस्थानात (Rajasthan) पाऊस नाही. सोबतच कोरडे वातावरण असल्यानं भारतीय हवामान विभागाकडून देशातून मान्सून मागे फिरत असल्याची घोषणा केली आहे. 

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरु झाला आहे. सर्वसाधारणपणे 17 सप्टेंबरला मान्सून माघारी फिरत असतो, मात्र यंदा 25 सप्टेंबर रोजी मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. याआधी भारतीय हवामान विभागाने 25 सप्टेंबरच्या आसपास मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल, असं सांगितलं होतं. यानंतर आज हवामान विभागाने घोषणा करत मान्सूनचा परतीला प्रवास सुरु झाल्याचं सांगितलं आहे.

मान्सूनचे आगमन आणि परतीचा प्रवास

नैऋत्य मान्सून सामान्यपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. साधारणपणे 17 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असतो.

राजस्थानमधून मान्सून माघारी परतला

महाराष्ट्रातील मागील काही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणांमधील पाणीसाठी वाढल्याने दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितलं होतं की, 25 सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे 25 सप्टेंबरपासून पावसाचा परतीला प्रवास सुरु होऊ शकतो. हवामान विभागाचा अंदाख खरा ठरला असून वायव्य राजस्थानमधून मान्सूनने निरोप देऊन तो आता माघारी परतला आहे.

 

 

[ad_2]

Related posts