Rudransh Patil Shooting : ठाण्याचा नेमबाज रुद्रांक्ष पाटील आणि सहकाऱ्यांनी जिंकलं सुवर्णपदक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ठाण्याचा नेमबाज रुद्रांक्ष पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चीनमधल्या एशियाडमध्ये आज भारताचं सुवर्णपदकांचं खातं उघडलं. चीनमधल्या हांगझाऊत सुरु असलेल्या एशियाडचा दुसरा दिवस हा भारतासाठी दुहेरी सोनेरी यश मिळवून देणारा ठरला. भारतीय पुरुषांनी आज सकाळी दहा मीटर्स एअर रायफल नेमबाजीत सोनेरी कामगिरी बजावली. ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह ऐश्वर्य तोमर आणि दिव्यांश पनवर यांचा समावेश असलेल्या भारतीय चमूनं एअर रायफल प्रकाराचं सांघिक सुवर्णपदक पटकावलं. विशेष म्हणजे या प्रकाराच्या पात्रता फेरीत भारतीय त्रिकूटानं एक हजार ८९३.७ गुणांसह नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. त्या तिघांनी याआधीचा एक हजार ८९३.३ गुणांचा विश्वविक्रम मोडीत काढला. भारताच्या एअर रायफल चमूला राष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरूर आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक थॉमन फ्रानिक यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. विशेष म्हणजे सुमा शिरूर ही पनवेलची आहे.</p>

[ad_2]

Related posts