Gold Silver Rate On 26 September 2023 In Mcx Gold Silver Price Dips Know City Wise Price 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Silver Rate: सोने आणि चांदी खरेदी (Gold Silver Rate) करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज बाजारात सोन्याचा दर (Gold Rate) हा 58 हजार 634 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात  0.11 टक्के म्हणजे 67 रुपयांची घसरण झाली आहे. कास बाजारात सोन्याचा दर हा 58 हजार 701 रुपये होता. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. 

Silver Rate : चांदीच्या दराची स्थिती काय?

चांदीच्या दरातही आज घट दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये चांदी घसरणीसह व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत चांदीच्या दरात 353 रुपयांची म्हणजेच 0.49 टक्क्यांची घट झाली आहे. आज चांदीचे दर हे 71 हजार 797 रुपयांवर होते. काल बाजारात चांदीचे दर 72 हजार 150 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरांचा विचार केला तर आज सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.1 टक्क्यांची घसरण झाली आहे.

जाणून घ्या 10 मोठ्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

दिल्ली- 24 कॅरेट सोने 59,880 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
कोलकाता- 24 कॅरेट सोने 59,730 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 4,800 रुपये प्रति किलो 
चेन्नई- 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 77,600 रुपये प्रति किलोग्रॅम 
मुंबई- 24 कॅरेट सोने 59,730 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलोग्रॅम 
लखनौ- 24 कॅरेट सोने 59,880 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलोग्रॅम 
पुणे- 24 कॅरेट सोने 59,730 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये किलो 
पाटणा- 24 कॅरेट सोने 59,780 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये किलो 
हैदराबाद- 24 कॅरेट सोने 59,730 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 77,600 रुपये प्रति किलोग्रॅम 
अहमदाबाद- 24 कॅरेट सोने 59,780 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलोग्रॅम 
जयपूर- 24 कॅरेट सोने 59,880 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलोग्रॅम 

जगभरात सोन्याला मागणी आहे. भारतात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र सोनं उत्पादन करण्यात भारत हा पहिल्या 10 देशांमध्येही नाही. ज्या देशांच्या मध्यवर्ती बँकेकडे जितकं अधिक सोनं आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, असे समजले जाते. भारत जगभरातून सोने आयात करतो. दरवर्षी शेकडो टन सोन्याची आयात केली जाते. जगातील सर्वाधिक सोने चीनमधून आयात केले जाते. 2022 या वर्षात चीनने जगातील सर्वाधिक 10.6 टक्के सोन्याचे उत्पादन केले. यानंतर, दुसरा सर्वात मोठा देश रशिया आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Gold : जगातील ‘या’ 10 देशांमध्ये सर्वाधिक सोनं उत्पादन; भारताचा क्रमांक कितवा?

[ad_2]

Related posts