EID Milad Bank Holiday 2023 When Bank Holiday 28 Or 29 September Check Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

EID Milad Bank Holiday: सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील बँका (Bank) आज आणि उद्या म्हणजे 27 आणि 28 सप्टेंबरला अनेक शहरांमध्ये बंद राहणार आहेत. कारण ईद-ए-मिलादनिमित्त 27 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर रोजी या दोन दिवशी बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर काही शहरांमध्ये बँका सुरु राहणार आहेत. तुम्हीही या दोन दिवसात बँकेत जाणार असाल तर तुम्ही ही यादी तपासा. कारण तुमच्या शहरातील बँकाही बंद राहू शकतात.

बँकांनी जरी सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी काही शहरांमध्ये बँका सुरु राहणार आहेत.  पाटणा, कोलकाता आणि श्रीनगरसारख्या शहरांमध्ये 27 आणि 28 तारखेलाही बँका सुरू राहणार आहेत. ईद-ए-मिलाद सणानिमित्त देशातील बहुतांश शहरांमध्ये 28 तारखेला बँका बंद राहणार आहेत. आज जम्मू आणि केरळमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.

उद्या ‘या’ राज्यातील बँका राहणार बंद 

ईद-ए-मिलाद निमित्त 28 सप्टेंबरला म्हणजे उद्या बँकांला सुट्टी असणार आहे. गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. 

29 सप्टेंबरला ‘या’ शहरातील बँका राहणार बंद

27 आणि 28 सप्टेंबर व्यतिरिक्त अनेक शहरांमध्ये 29 तारखेलाही बँकांना सुट्टी असणार आहे. ईद-ए-मिलाद-उल-नबीनंतर इंद्रजत्रेनिमित्त बँका बंद राहणार आहेत. सिक्कीम, जम्मू आणि श्रीनगरमध्ये 29 सप्टेंबरला बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. 

ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार?

2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. त्यानंतर नवरात्री उत्सव, दसरा यामुळं बँका बंद राहणार आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि प्रादेशिक बँकांनाही 15 दिवस सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत, बँकेशी संबंधित कोणतेही कामे करताना अडचण येऊ नये म्हणून, सुट्टीची यादी देण्यात आली आहे. 

ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी बंद राहणार बंद 

1 ऑक्टोबर 2023- रविवारमुळं देशभरात बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर 2023 – गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
8 ऑक्टोबर 2023- रविवारमुळं देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
14 ऑक्टोबर 2023- महालयामुळं कोलकातामध्ये आणि दुसऱ्या शनिवारी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
15 ऑक्टोबर 2023- रविवारमुळं संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.
18 ऑक्टोबर 2023- गुवाहाटीमध्ये काटी बिहू या सणामुळं बँका बंद राहणार.
21 ऑक्टोबर 2023- दुर्गापूजा/महा सप्तमीनिमित्त आगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता येथील बँकांना सुट्टी असेल.
22 ऑक्टोबर 2023- रविवारमुळं देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
24 ऑक्टोबर 2023- दसऱ्यामुळं हैदराबाद आणि इंफाळ वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
25 ऑक्टोबर 2023- गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे (दसई) बँका बंद राहतील.
26 ऑक्टोबर 2023- गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये दुर्गा पूजा (दसाई)/अॅक्सेशन डे बँका बंद राहतील.
27 ऑक्टोबर 2023- गंगटोकमध्ये दुर्गापूजेला (दसई) बँका बंद राहतील.
28 ऑक्टोबर 2023- कोलकात्यासह संपूर्ण देशात लक्ष्मीपूजन आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
29 ऑक्टोबर 2023- देशभरात बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर 2023- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहमदाबादमधील बँकांना सुट्टी असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

RBI Action Against SBI : आरबीआयकडून एसबीआयसह तीन सरकारी बँकांवर कारवाईचा बडगा; ग्राहकांवर परिणाम होणार?

[ad_2]

Related posts