[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ayodhya Ram Mandir : रामनगरी अयोध्येमध्ये (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठेच्या (Pran Pratishtha) कार्यक्रमांची तयारी जोरात सुरु आहे. जानेवारीमध्ये रामलल्लाच्या (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला असून त्यासाठी लगबग सुरु आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ramlala Pran Pratishtha) करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम 14 जानेवारीपासून सुरु होणार असून पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
अयोध्या नगरी सज्ज!
रामलल्ला (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय भव्य-दिव्य सोहळा करण्यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून (Ram Mandir Trust) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरातील प्रभू श्रीरामाचे भक्त अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टकडून तयारी सुरु आहे. राम मंदिर ट्रस्टच्या मते, एका दिवसात सुमारे 75,000 भक्त राम मंदिरात दर्शन घेऊ शकतील, अशी माहिती देण्यात आली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या बांधकामासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या खजिन्यातून एक रुपयाही खर्च झालेला नाही.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला
श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती देत सांगितलं की, मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. 14 ते 15 जानेवारी या कालावधीत संत आणि ऋषीमुनींच्या हस्ते अभिषेकासह प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख झालेली नाही.
मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे
मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या दोन मूर्ती असतील. एक प्रभू श्रीरामाच्या बालपणातील आणि दुसरा रामलल्लाची असेल. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी रुरकी आणि पुणे येथील संस्थांमधील शास्त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे.
दररोज सुमारे 75 हजार भाविक दर्शन घेणार
26 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले केले जाईल, त्यानंतर रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, अयोध्येतील राम मंदिरात दररोज सुमारे 75 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील.
महत्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]