[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indias Overseas Debt: भारतावरील परदेशी कर्जाचा (Overseas Debt) डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात भारतावर असणाऱ्या एकूण विदेशी कर्जात वाढ झाल्याचे समोर आले आहे. रिझव्र्ह बँकेनं जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, जून 2023 पर्यंत भारताचे एकूण बाह्य कर्ज 629 अब्ज डॉलर होते. हे कर्ज मागील वर्षीच्या तुलनेत वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाह्य कर्जापेक्षा 2.7 टक्के अधिक आहे. तर या कालावधीत एनआरआय ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे.
कर्ज वाढण्याचं मुख्य कारण
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, गेल्या एका वर्षात परदेशी कर्ज वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे एनआरआय ठेवींमध्ये झालेली लक्षणीय वाढ. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, या काळात विदेशी कर्जाला कारणीभूत असलेले इतर सर्व घटक जवळपास स्थिर राहिले आहेत. सेंट्रल बँक सोडल्यास, अनिवासी भारतीयांच्या ठेवी मुख्यतः ठेवी घेणार्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून येतात आणि त्यांची कर्ज म्हणून गणना केली जाते.
एनआरआय ठेवी वाढल्या कशा?
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, जून तिमाहीत अशा ठेवी 6.5 टक्क्यांनी वाढून $167 अब्ज झाल्या आहेत. एक वर्षापूर्वी, म्हणजेच जून 2022 च्या तिमाहीच्या समाप्तीनंतर, हा आकडा $157 अब्ज होता. तर बिगर-वित्तीय कॉर्पोरेशन्सच्या ठेवी $250 बिलियनवर स्थिर राहिल्या. सर्वसाधारण सरकारी कर्ज कमी झाले आहे, तर गैर-सरकारी कर्ज वाढले आहे, असेही या आकडेवारीवरून दिसून येते.
परकीय कर्जामध्ये अमेरिकेचा वाटा सर्वाधिक
भारताच्या एकूण परकीय कर्जामध्ये अमेरिकन डॉलर मूल्यांकित कर्जाचा वाटा सर्वात मोठा आहे. जून 2023 च्या तिमाहीच्या समाप्तीनंतर, त्यांचा हिस्सा 54.4 टक्के होता. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय रुपयातील कर्ज आहे. ज्याचा हिस्सा सध्या 30.4 टक्के आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकन रँड 5.7 टक्के योगदानासह तिसऱ्या स्थानावर, जपानी येन 5.7 टक्के योगदानासह चौथ्या स्थानावर आणि युरो 3 टक्के योगदानासह पाचव्या स्थानावर आहे.
बाह्य कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण घटलं
जून तिमाहीत बाह्य कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण मार्च 2023 तिमाही संपल्यानंतर 18.8 टक्के होते, जे जून तिमाहीच्या अखेरीस 18.6 टक्क्यांपर्यंत खाली आले. या कालावधीत कर्ज सेवेत म्हणजेच कर्ज भरणामध्ये चांगली वाढ झाली आहे. मार्च 2023 अखेर 5.3 टक्के होता, जो जून 2023 अखेर 6.8 टक्के झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Mudra Loan: व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय, ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार 10 लाखांचं कर्ज; जाणून घ्या प्रक्रिया
[ad_2]