[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : इतिहासात आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी ठरल्या आहेत. तर महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस हा काळरात्रीचा ठरला. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यात भूकंप झाला आणि त्यामध्ये सुमारे दहा हजार लोकांनी आपलं आयुष्य गमावलं. तर आजच्याच दिवशी आजच्याच दिवशी जोधपुरातील एका मंदिरात गोंधळ माजला आणि त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान इतिहासात आजच्याच दिवशी औरंगजेबाने गोवळकोंडा किल्ला ताब्यात घेतला होता. तर इंडोनेशियामध्ये झालेल्या भूकंपात 1100 लोकांचा मृत्यू झाला.
1687- औरंगजेबने गोवळकोंडा किल्ला ताब्यात घेतला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर दक्षिण जिंकण्याची मोहीम औरंगजेबाने हाती घेतली. यामध्ये त्याने पहिला हल्ला हा कुतुबशाहवर केला. त्यासाठी त्याने 30 सप्टेंबर 1687 सालीगोवळकोंडा (Golconda Fort) हा किल्ला ताब्यात घेतला. 11 व्या शतकात वरंगलचा राजा काकतिया प्रतापरुद्रने गोवळकोंडा या ठिकाणी मातीचा किल्ला बांधला. 14 व्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या तो ताब्यात आला. हिर्याच्या खाणींमुळे गोवळकोंडा हे हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांचे मुख्य केंद्र म्हणून भरभराटीस आले.
1922 : चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा जन्म
चित्रपट दिग्दर्शक, संपादक आणि लेखक म्हणून ख्याती मिळवलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. , त्यांनी चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत 42 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर ऋषी-दा या नाव्याने त्यांना चित्रपटसृष्टी ओळखत होती. त्यांना भारतातील ‘मध्यम सिनेमा’चे प्रणेते म्हणून ओळखले जाते.अनारी , सत्यकम , चुपके चुपके , अनुपमा , आनंद , अभिमान , गुड्डी , गोलमाल , मजली दीदी , चैताली , आशीर्वाद , बावर्ची , खुबसूरत , किसी से ना कहना , आणि यांसारख्या अनेक चित्रपटांमुळे त्यांची ख्याती वाढली. भारत सरकारने त्यांना 1999 मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार आणि 2001 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. मुखर्जी यांनी 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात कलकत्ता येथील बी.एन. सिरकारच्या न्यू थिएटर्समध्ये सुरुवातीला कॅमेरामन काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांची निवड चित्रपट संपादक म्हणून करण्यात आली.
1972 : पार्श्वगायक शान यांचा जन्म
प्रसिद्ध पार्श्वगायक शंतनू मुखर्जी अर्थातच शान यांचा 30 सप्टेंबर 1972 रोजी जन्म झाला. त्यांनी सारेगमप यांसारख्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना संगीताची मेजवानी दिली. त्यांनी गायलेल्या चाँद सी फारिश या गाण्याला फिल्मफेअर देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात ही श्वेता शेट्टींच्या अल्बपासून केली. त्यानंतर हळूहळू हिंदी पॉप गाणी गाण्यास सुरुवात केली.
1993 : लातूर भूकंपमध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू
महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ज्याची नोंद ठेवली जाते तो म्हणजे आजचा दिवस. आजच्या दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबर 1993 साली लातूरमधील किल्लरी गावामध्ये 6.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आणि लातूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या भूकंपामध्ये 52 गावातील तीस हजारांपेक्षा जास्त कायमची घरं उध्वस्त झाली. दरम्यान या भूकंपामध्ये दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले. सोळा हजारपेक्षा जास्त लोकं जखमी झालीत. तर पंधरा हजारपेक्षा अधिक पशूधन यामध्ये दगावले.
या भूकंपाचा धक्का केवळ लातूरचा नाही तर त्यासह 11 जिल्ह्यांना बसला होता. या भूकंपामध्ये आकराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. 29 वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेमुळे 52 गावांचा इतिहास बदलला होता. तर आजही लातूर आणि धाराशिवमधील 52 गावांमध्ये या भूकंपाच्या खुणा आहेत. येथील लोकांचे पुर्नवसन झाले असले तरीही जुन्या जखमा या आजही दर 30 सप्टेंबरला पुन्हा भळभळतात.
1996 : मद्रासचे नाव चेन्नई झालं
तामिळनाडूची राजधानी मद्रास या शहराचं नाव 30 सप्टेंबर 1996 रोजी बदलण्यात आलं. या शहराचं नाव चेन्नई (Chennai) असं करण्यात आलं.
2008 : जोधपूरच्या मंदिरात अफवेमुळे चेंगराचेंगरी, 224 लोकांचा मृत्यू
30 सप्टेंबर 2008 रोजी जोधपूरच्या (Jodhpur) एका मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 224 लोकांचा मृत्यू झाला.
2009 : इंडोनेशियातील भूकंपामध्ये 1100 लोकांचा मृत्यू
30 सप्टेंबर 2009 रोजी पश्चिम इंडोनेशियामध्ये (Indonesia Earthquake) भूकंप झाला आणि त्यामध्ये 1100 लोकांचा मृत्यू झाला होता.
2001 : केंद्रीय रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांचे निधन
माधवराव शिंदे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. 1971, इ.स. 1977, इ.स. 1980 आणि इ.स. 1999 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुणा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. 1984, इ.स. 1989, इ.स. 1991, इ.स. 1996 आणि इ.स. 1898 च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला. तर राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्यावर रेल्वे खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या काळात त्यांनी भारतीय रेल्वेच्या संगणकीकरणावर भर दिला.
पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री आणि मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून धुरा सांभाळली. 1996 साली त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसबाहेर पडून स्वतःचा मध्यप्रदेश विकास काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. पी.व्ही. नरसिंह राव यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 30 सप्टेंबर 2001 रोजी ते लखनौ येथे क्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात होते. त्यावळी त्यांचे विमान उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
इतर महत्त्वाच्या घडामोडी :
1960 : ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.
1895 : फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
1947 : पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.
1992 : लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन.
1998 : भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.
[ad_2]