Karnataka Ministers Portfolios CM Siddaramaiah Keeps Finance Intelligence Dy CM DK Shivakumar To Preside Over Irrigation Bengaluru Development

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Karnataka Cabinet Portfolio : कर्नाटकात काँग्रेसने (Congress) भाजपला चीतपट करत एकहाती सत्ता मिळवली आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी शपथ घेतली. सिद्धरामय्या यांनी आज (29 मे) आपल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप (Cabinet Portfolios) जाहीर केलं आहे. 

सिद्धरामय्या यांनी अर्थ विभाग स्वतःकडे ठेवला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्य आणि मध्यम सिंचन आणि बंगळुरु शहर विकास, एचके पाटील यांच्याकडे कायदा आणि संसदीय कामकाज, दिनेश गुंडू राव यांच्याकडे कायदा, पर्यटन आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृष्णा बायरेगौडा यांच्याकडे महसूल खातं (मुझराई वगळता) देण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जी परमेश्वरा यांना गृहखातं देण्यात आलं आहे. मात्र, गुप्तचर माहिती हे खातं सिद्धरामय्या यांनी स्वतःकडे ठेवलं आहे. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते आहे ते जाणून घेऊयात सविस्तर… 

सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप

सिद्धारामय्या (मुख्यमंत्री) – अर्थ, मंत्रिमंडळ कार्य, वैयक्तिक आणि प्रशासकीय सुधारणा, गुप्तचर, माहिती, आयटी आणि बीटी, पायाभूत सुविधा विकास 

डीके शिवकुमार (उपमुख्यमंत्री) – प्रमुख आणि मध्यम पाटबंधारे विभाग, बंगळुरु शहरी विकास (बीबीएमपीसह), बीडीए, बीडब्ल्यूएसएसबी, बीएमआरडीए, बीएमआरसीएल

news reels Reels

डॉ. जी परमेश्वर (कॅबिनेट मंत्री) – गृह विभाग (गुप्तचर विभागाचा समावेश नाही)

एचके पाटील (कॅबिनेट मंत्री) – कायदा आणि संसदीय कामकाज, विधी, पर्यटन

एचके मुनियप्पा (कॅबिनेट मंत्री) – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक 

रामलिंगा रेड्डी (कॅबिनेट मंत्री) – वाहतूक आणि मुझराई

एमबी पाटील (कॅबिनेट मंत्री) – अवजड आणि मध्यम उद्योग

केजे जॉर्ज (कॅबिनेट मंत्री)- ऊर्जा

दिनेश गुंडु राव (कॅबिनेट मंत्री) – आरोग्य आणि कुटुंब कल्याण

एचसी महादेवप्पा (कॅबिनेट मंत्री)- सामाजिक कल्याण

सतीश जरकीहल्ली (कॅबिनेट मंत्री)- सार्वजनिक कामे

कृष्णा बायरेगौड़ा (कॅबिनेट मंत्री)- महसूल (मुझराई वगळून)

प्रियांक खरगे (कॅबिनेट मंत्री)- ग्रामविकास आणि पंचायत राज

शिवानंद पाटील (कॅबिनेट मंत्री) – वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि साखर संचालनालय

बीजी जमीर अहमद खान (कॅबिनेट मंत्री) – गृहनिर्माण, वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण

शरणाबसप्पा दर्शनापुर (कॅबिनेट मंत्री) – लघु उद्योग, सार्वजनिक उपक्रम

ईश्वर खांद्रे (कॅबिनेट मंत्री)- वन आणि पर्यावरण

एन. चेलूवर्यास्वामी (कॅबिनेट मंत्री) – कृषी

एसएस मल्लिकार्जुन (कॅबिनेट मंत्री) – खाणकाम आणि भूविज्ञान, फलोत्पादन

रहीम खान (कॅबिनेट मंत्री) – महापालिका प्रशासन, हज

संतोष एस लाड (कॅबिनेट मंत्री) – श्रम

शरणप्रकाश रुद्रप्पा पाटिल (कॅबिनेट मंत्री) – वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास

तिम्मापुर रामप्पा बालप्पा (कॅबिनेट मंत्री) – अबकारी

के वेंकटेश (कॅबिनेट मंत्री)- पशुपालन आणि रेशीम शेती

टंगादागी शिवराज संगप्पा (कॅबिनेट मंत्री) – मागासवर्गीय, कन्नड आणि संस्कृती

डी सुधाकर (कॅबिनेट मंत्री) – योजना आणि आकडे

बी नागेंद्र (कॅबिनेट मंत्री) – युवक सेवा, क्रीडा, अनुसूचित जमाती कल्याण

कीथासांद्रा एन राजन्ना (कॅबिनेट मंत्री) – सहकार आणि कृषी विपणन 

सुरेश बीएस (कॅबिनेट मंत्री) – शहरी विकास आणि नगर नियोजन (बंगळुरु शहराच्या विकासासह नाही)

लक्ष्मी आर हेब्बलकर (कॅबिनेट मंत्री) – महिला आणि बालकल्याण, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण

मनकल वैद्य (कॅबिनेट मंत्री) – मत्स्यव्यवसाय आणि बंदरे, राज्यांतर्गत वाहतूक

मधु बंगारप्पा (कॅबिनेट मंत्री) – शालेय शिक्षण 

एमसी सुधाकर (कॅबिनेट मंत्री) – उच्च शिक्षण

एनएस बोसेराजू (कॅबिनेट मंत्री) – लघु पाटबंधारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान

[ad_2]

Related posts