[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
TMB MD Resigns: तामिळनाडू मर्कंटाइल बँकेनं (tamil nadu mercantile bank) चुकून एका कॅब ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल 9000 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस कृष्णन (CEO S Krishnan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनाम्याची माहिती देताना एस कृष्णन यांनी वैयक्तिक कारणामुळं पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांचा मोठा कार्यकाळ अद्यापही बाकी आहे.
गेल्या काही दिवसापासून तामिळनाडू मर्कंटाइल बँक चर्चेत आहे. आता या बँकेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस कृष्णन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी एका कॅब ड्रायव्हरच्या खात्यात बँकेने चुकून 9000 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. त्यामुळं एस कृष्णन यांनी राजीनामा दिला आहे.
बँकेने स्वीकारला राजीनामा
बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तामिळनाड मर्कंटाइल बँकेने कृष्णन यांच्या राजीनाम्याची माहिती बाजार नियामकाला दिली आहे. यासोबतच बँकेच्या संचालक मंडळाने 28 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत एमडीचा राजीनामाही स्वीकारला आहे. यानंतर रिझर्व्ह बँकेलाही माहिती देण्यात आली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले होते. रिझर्व्ह बँकेकडून मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त होईपर्यंत कृष्णन हे या पदावर कायम राहतील.
नेमकं प्रकरण काय?
तामिळनाड मर्कंटाइल बँकेने चुकून एका कॅब ड्रायव्हरच्या खात्यात 9000 कोटी रुपये ट्रान्सफर केले. चेन्नईतील कॅब चालक राजकुमार याचेही तामिळनाडू मर्कंटाइल बँकेत खाते होते. या ड्रायव्हरच्या खात्यात 9000 कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला तेव्हा तो चक्रावून गेला. हा फेक मेसेज आहे असे त्याला वाटले. पण त्याने 21,000 रुपये त्याच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केल्यावर त्याला समजले. अशा स्थितीत एवढी मोठी रक्कम प्रत्यक्षात आपल्या खात्यात जमा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, अवघ्या अर्ध्या तासात बँकेने ती रक्कम कॅब चालकाच्या खात्यातून काढून घेतली.
महत्त्वाच्या बातम्या:
External Debt: भारतावर विदेशी कर्जाचा डोंगर! मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ; वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर
[ad_2]