LPG Commercial Gas Cylinder Price Increased By Rs 209 Know Delhi Mumbai Price Check Latest Rate Updates Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Commercial LPG Cylinder Price Hike: आज 1 ऑक्टोबर… आजपासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. आधीपासूनच महागाईनं (Inflation) पिचलेल्या सर्वसामान्यांना आज आणखी एक झटका बसला आहे. आजपासून एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price Rise) वाढली आहे. तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत मोठी वाढ केली आहे. दरवाढीनंतर 19 किलोचा सिलेंडर 209 रुपयांनी महागला आहे. 

मुंबई, दिल्लीतील एलपीजी सिलेंडरच्या किमती काय? 

ऑक्टोबर महिन्यात नवरात्री, दसरा यांसारखे सण साजरे केले जाणार आहेत. अशातच सणासुदीच्या काळातच एलपीजीच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण वाढणार आहे. तेल कंपन्यांकडून एलपीजीच्या 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Gas Cylinders Price Hike)  किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 209 रुपयांच्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी आता 1,731.50 रुपये आकारले जातील. तर, देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी 1684 रुपये आकारले जातील. दरम्यान, यापूर्वी 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींत 157 रुपयांनी कपात करण्यात आली होती आणि आता त्यापेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही बदल?  

अवघ्या महिन्याभरापूर्वी केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची मोठी कपात केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज तेल कंपन्यांनी केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत बदल केले असून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जुन्याच दरांवर कायम आहेत. 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे. 

सप्टेंबरमध्ये घटलेले LPG सिलेंडरचे दर 

सप्टेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर घटल्यानंतर याची किंमत दिल्लीमध्ये 1,522 रुपये झाली होती. एक ऑक्टोबर 2023 बाबत दिल्ली व्यतिरिक्त इतर महानगरांबाबत बोलायचं झालं, तर कोलकातामध्ये 19 किलोग्राम LPG Cylinder 1636 रुपये नाही, तर 1839.50 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत याची किंमत 1482 रुपयांवरुन थेट 1684 रुपये, तसेच चेन्नईमध्ये 1898 रुपयांवर पोहोचली आहे. 

सरकारनं दिलेला दिलासा 

30 ऑगस्ट रोजी सरकारनं 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर आली आहे. इतर अनेक शहरांमध्ये सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय, उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध एलपीजी गॅस सबसिडी देखील 400 रुपये करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलेंडरची किंमत 703 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

New Rules from 1st October : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ नियमात होणार बदल…तुमच्या खिशावरही होणार परिणाम…जाणून घ्या नवे नियम

[ad_2]

Related posts