Nashik Latest News Village To Village Cleanliness Campaign With Bharati Pawar In Nashik District Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत (Swachh Bharat Mission) देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज सकाळी एक तास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिकजवळील रामशेजच्या पायथ्याशी मंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) देखील आपल्या पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवत अभियानात सहभाग घेतला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून देशात आज ‘एक तारीख एक तास’ हा श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात आला असून जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये सकाळी 10 वाजता एकाचवेळी श्रमदान मोहिम करण्यात आली. देशभरात एकाचवेळी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम असून शहर, नगरपरिषद, तसेच प्रत्येक गावांमध्ये सदरचा उपक्रम राबविण्यात आला. नाशिक (Nashik District) जिल्हयातील सर्व नागरिक तसेच सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान दिल्याचे पाहायला मिळाले. राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते आज सकाळी रामशेज किल्ला (Ramshej Fort) परिसराची साफ सफाई करण्यात आली. भारती पवार यांनी स्वतः किल्ल्याच्या पायथ्यापासून ते पायऱ्यांपर्यंत हातात झाडू घेऊन हा परिसर स्वच्छ केला. पवार यांच्यासमवेत नाशिकचे जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच आशेवाडी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडून यावेळी हातात फलक घेऊन जनजागृतीपर संदेशही देण्यात आले. 

नाशिक जिल्हयातील गावागावात स्वच्छता अभियान (Nashik Clean Campaign) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी व शाळा परिसर, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचा परिसर, पर्यटन स्थळ, बसस्थानक, धार्मिकस्थळ, नदी किनारे आदी ठिकाणे मोहीम राबविण्यात आली. आहेत. यासाठी महिला बचतगट, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व शासकीय कर्मचारी, युवक मंडळे, विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, धर्मदाय प्रतिष्ठाण इतर मंडळे व संस्था आदिंनी सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले. तसेच नाशिक शहरातील पोलीस प्रशासनाने देखील या मोहिमेत सहभागी होत पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम 

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्यातील विविध गड -किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आपला परिसर आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवले गेले पाहिजेत. या पार्श्वभूमीवर शिवरायांना एक अनोखी मानवंदना स्वच्छतेच्या माध्यमातून देण्यात आली. स्वच्छता अभियान मोहीम अंतर्गत भारती पवार यांच्या हस्ते आज सकाळी रामशेज किल्ला परिसराची साफ सफाई करण्यात आली. भारती पवार यांनी स्वतः किल्ल्याच्या पायथ्यापासून ते पायऱ्यांपर्यंत हातात झाडू घेऊन हा परिसर स्वच्छ केला. पवार यांच्यासमवेत नाशिकचे जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच आशेवाडी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

इतर महत्वाची बातमी : 

[ad_2]

Related posts