Uttar Pradesh Aligarh Bjp Mp Satish Gautam Video First Touched Female Mla Hand Protested Then Press Shoulders Start Laughing Viral Video Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BJP MP Satish Gautam and MLA Mukta Raja : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलिगडमधील (Aligarh) भाजप खासदार (BJP MP) सतीश गौतम (Satish Gautam) सध्या चर्चेत आहेत. भाजप खासदार सतीश गौतम (BJP MP Satish Gautam) एका महिला खासदारासोबत भरसभेत गैरवर्तन करतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमुळे सतीश गौतम चर्चेत आले आहेत. व्हिडीओमध्ये सतीश गौतम यांचं वर्तन आक्षेपार्ह असल्याने त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

भाजप खासदार सतीश गौतम यांचं महिला आमदाराशी गैरवर्तन

या व्हायरल व्हिडीओमध्ये भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा कोल भागात आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते, त्यावेळीचा हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी सतीश गौतम यांनी मुक्ता राजा यांचा आणि हात पकडला मग, खांदा दाबल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही घटना उपस्थितांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भाजप खासदार सतीश गौतम यांचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहा

सतीश गौतम यांचा व्हिडीओ चर्चेत

भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा यांच्यातील ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खासदार सतीश गौतम महिला आमदार मुक्ता राजा यांचा आधी हात पकडतात. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. यानंतर महिलेने विरोध केल्यावर खासदार महिला आमदाराचे दोन्ही खांदे दाबतात आणि हसायला लागतात. त्यानंतर महिला आमदाराने खासदारांला झटकून कोपरखळी दिल्याचं दिसून येत आहे. 

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हे गैरवर्तन भरकार्यक्रमात झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. यावेळी भाजप खासदार आणि महिला आमदाराच्या आजूबाजूला अनेक मनान्यवर उपस्थित असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. असून यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एबीपी माझा या व्हिडीओबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.

महत्वाच्या इतर बातम्या :



[ad_2]

Related posts