Bageshwar Baba Program Organized In Chhatrapati Sambhajinagar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bageshwar Dham in Chhatrapati Sambhajinagar : अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे बागेश्वर धाम (Bageshwar Dham) यांचा दरबार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भरणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच, 5, 6, 7 नोव्हेंबरमध्ये हा दरबार शहरात भरणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मध्यप्रदेशातील छत्रपूर येथे जाऊन बागेश्वर महाराज यांची भेट घेतली होती. तसेच, बागेश्वर धाम यांना छत्रपती संभाजीनगर शहरात दरबार भरवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता बागेश्वर धाम यांनी 5, 6, 7 नोव्हेंबरची तारीख दिली असल्याची माहिती कराड यांच्या कार्यालयातून कळवण्यात आली आहे. 

बागेश्वर धाम हे मध्य प्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यातील गारा गावातील आहे. दरम्यान, भागवत कराड मागील सहा महिन्यापासून बागेश्वर धाम यांच्या संपर्कात होते. तसेच, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे दरबार भरवण्याचे निमंत्रणही दिले होते. त्यांचे निमंत्रण बागेश्वर बाबा यांनी स्वीकारले असून, नोव्हेंबर महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ते येणार आहे .

बागेश्वर धाम यांचा भव्य दिव्य असा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार असून, तब्बल 100 एकर परिसरावरती भव्य मंडप आणि किमान दहा लाख नागरिकांना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. तसेच, तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असून या तीन दिवसांमध्ये बाबांचा दरबार भरणार आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू असून, दिवाळीच्या अगोदरच बागेश्वर धाम छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे. 

साईबाबांबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य

बागेश्वर धाम अनकेदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. यापूर्वी देखील त्यांनी साईबाबांबाबत असेच वक्तव्य केल्याने चर्चेत आले होते. यावेळी बोलतांना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, “साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही.”असे बागेश्वर धाम म्हणाले होते. विशेष म्हणजे त्यांच्या याच वक्तव्यानंतर मुंबईच्या वांद्रे पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध?

यापूर्वी राज्यात झालेल्या बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नेहमी विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला देखील असाच विरोध झाला होता. सोबतच, महाराष्ट्र काँग्रेसने देखील यावेळी विरोध केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांना हत्येची धमकी; आरोपी अटकेत

[ad_2]

Related posts