[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : मागील काही महिन्यांपासून भारताकडून (India) दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा केला जात आहे. दरम्याच याचसंदर्भातील महत्त्वाची बाब सध्या समोर आली आहे. पाकिस्तानातील (Pakistan) कराचीमध्ये एका अज्ञात व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर ही व्यक्ती मुफ्ती कैसर फारूख असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. दरम्यान हा नक्की कैसर फारुखच आहे का यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कैसर हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्याला भारताकडून लक्ष्य करण्यात आल्याचा संशय पाकिस्तानी संशय पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मात्र भारताकडून अद्याप कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.
पाकिस्तानातील कराचीमधील शनिवार (30 सप्टेंबर) रोजी समनाबादमध्ये एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान या गोळीबारामध्ये एक विद्यार्थी देखील जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. तर ज्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली तो कैसर फारुख असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर करण्यात येतोय.
गोळ्या झाडून अज्ञात इसमाची हत्या
पाकिस्तानी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कराचीमधील ईडी सेंटरजवळ असलेल्या गुलशन-ए-ओमर या मदरसा येथे काही सशस्त्र लोकांनी 30 वर्षीय एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. दरम्यान यावेळी 10 वर्षीय शाकीर नावाच्या मुलावर देखील गोळ्या झाडण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर गोळ्या झाडलेल्या लोकांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान या दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्या 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शाकीर हा एका मदरसामधील विद्यार्थी होता. ज्या दोघांवर गोळी झाडण्यात आली त्यांच्याकडून कोणतीही वस्तू हिसकावण्यात आली नाही. त्यामुळे ही एक टार्गेट किलिंग असू शकते, असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो कैसर फारुख असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या ती व्यक्ती काही लोकांसोबत चालत होती. त्यावेळी अचानक त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी त्याच्या शेजारी असलणाऱ्या लोकांनी तिथून लगेचच पळ काढला.
ज्या लोकांनी हा गोळीबार केला त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. दर ज्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या तो नक्की कैसर फारुख आहे की दुसरं कोणी याचा देखील तपास पोलीस करत आहे. त्यामुळे जर कैसर फारुखचा यामध्ये मृत्यू झाला असेल तर भारताच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच, तरीही कॅनडानं…; न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानं खळबळ
[ad_2]