PM Modi Message On Gandhi Jayanti Lal Bahadur Shashtri Jayanti Jai Jawan Jai Kisan India Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi on Gandhi Jayanti 2023 : आज 2 ऑक्टोबर रोजी, देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (Mahatma Gandhi Jayanti) आणि लाल बाहदूर शास्त्री जयंती (Gandhi Jayanti) मोठ्या साजरी केली जात आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लाल बाहदूर शास्त्री जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दोन्ही नेत्यांना आदरांजली दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी देशाच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिलं असून त्यांच्या विचाराने प्रेरित होण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्टही शेअर केली आहे.

‘त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू’

पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना नमन करतो. त्यांची काळातीत शिकवणीमुळे आमचा मार्गातील अंधार दूर झाला. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक पातळीवर असून, यामुळे संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. एकता आणि सुसंवाद वाढण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. त्यांचे विचार प्रत्येक तरुणातील बदलासाठी सक्षम आहेत.’

देशभरात गांधी जयंतीचा उत्साह

आज संपूर्ण देशभरात गांधी जयंती साजरी केली जात आहे. दिल्लीतील राजघाटावर आज एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते राजघाटावर पोहोचणार आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छता मोहीमही राबवली जात आहे. 

जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

बापूंनी नेहमीच सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. गांधींजींचे विचार फक्त भारतासाठी नाही तर, जगासाठी मार्गदर्शक आहेत. दरवर्षी 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजता केला जातो. संयुक्त राष्ट्राने 15 जून 2007 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाची घोषणा केली होती. तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

लाल बहादूर शास्त्रींनाही आदरांजली

पंतप्रधान मोदी यांनी लाल बहादूर शास्त्रीजींना आदरांजली अर्पण केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहीलं की, ‘लाल बहादूर शास्त्रीजींचं त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. त्यांचा साधेपणा, राष्ट्राप्रती समर्पण आणि ‘जय जवान, जय किसान’ हा नारा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. भारताच्या प्रगतीसाठी त्यांची बांधिलकी आणि आव्हानात्मक काळात त्यांचे नेतृत्व अनुकरणीय आहे. सशक्त भारताचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सतत कार्य करू या.’

महत्वाच्या इतर बातम्या :



[ad_2]

Related posts