Rbi Repo Rate Mpc Meeting Reserve Bank Of India Governor Shaktikanta Das Likely To Unchange Repo Rate This Week

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RBI Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) आगामी बैठकीमध्ये रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI Repo Rate) रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आरबीआय रेपो रेट कायम ठेवण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

तुमच्या कर्जाचा बोजा कमी होणार? 

भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेपो दर या वेळीही कायम राहू शकतो. या आठवड्यात आरबीआयची पतधोरण बैठक होणार असून आठवड्याच्या शेवटी व्याज वाढीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. तर, व्याजदर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठक 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढणार की दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

RBI रेपो रेटबाबतच्या निर्णयाकडे लक्ष

आरबीआय महागाई दर आणि कच्च्या तेलावर लक्ष ठेवत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 10 महिन्यांतील सर्वात वेगाने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आरबीआय रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. सध्याचा रेपो दर 6.50 टक्के आहे. 

चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल नाही?

आरबीआयने यावेळीही रेपो दर कायम ठेवल्यास ही भारतीय रिझर्व्ह बँकेची सलग चौथी बैठक असेल ज्यामध्ये रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून कायम ठेवण्यात येईल. मागील बैठकांमध्ये, महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि बाजाराची स्थिती राखण्यासाठी आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवले होते.

कर्जाचा बोजा कमी होण्याची शक्यता

भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याज दर स्थिर ठेवला तर, बँकांकडून कर्जाचा व्याजदर कमी करण्यात येऊ शकतो किंवा कायम ठेवू शकतात. त्यामुळे ग्राहकांचा बोझा वाढणार नसून कमी होण्याची शक्यता आहे.

…तर रेपो दर वाढू शकतो

DCB बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राधिका राव यांनी सांगितलं की, जागतिक कच्च्या तेलाच्या किमती नोव्हेंबर 2022 मध्ये उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आयबीआयच्या एप्रिल महिन्याच्या अंदाजानुसार, प्रति बॅरल 85 डॉलर या अंदाजाच्या पुढे गेली आहे. सप्टेंबर महिन्याची सरासरी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सुमारे 9 टक्क्यांनी जास्त आहे. त्याचबरोबर इक्विटी मार्केटमध्ये विक्रेत्यांची संख्याही वाढली आहे. रुपयातही घसरण दिसून आली आहे. अशा स्थितीत व्याज दर वाढण्याची किंवा कायम ठेवण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts