[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: जगात असे अनेक लोक आहेत जे विविध प्रकारची कामं करून विश्वविक्रम (World Record) करतात. भारतीय लोक तर भन्नाट प्रकारची कामं करुन विक्रम रचत असतात. सामान्य माणूस विचारही करू शकत नाही, असे काम करून काही लोक विश्वविक्रम करत आहेत. दिल्लीच्या विनोद चौधरी यांनीही असंच काम केलं आहे. त्यांनी हाताऐवजी नाकाने टायपिंग करून विश्वविक्रम केला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे करत त्यांनी एक नाही, तर तब्बल 15 वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहेत.
कोण आहेत विनोद चौधरी?
तुम्ही मशिनसारख्या वेगात हाताने टायपिंग करणारे लोक पाहिले असतील.पण कधी कुणाला नाकाने किंवा तोंडाने टाईप करताना पाहिलं आहे का? तर भारतातल्याच एका व्यक्तीने ही कमाल केली आहे. त्यांच्या या अनोख्या टॅलेंटची गिनीज बुकमध्येही (Guinness World Records) नोंद झाली आहे.
विनोद चौधरी हे दिल्लीचे रहिवासी आहेत. सुमारे 9 वर्षांपूर्वी त्यांनी हे काम सुरू केलं आणि आतापर्यंत त्यांनी 15 विश्वविक्रम केले आहेत. येथे एक गोष्ट स्पष्ट करूया की, त्यांनी नाकाने टाईप करून केवळ तीन विश्वविक्रम केले आहेत. उर्वरित जागतिक विक्रम हे फक्त टायपिंगमध्ये आहेत, परंतु वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आहेत.
विनोद नाकाने आणि तोंडात स्टिक धरून तसंच डोळ्यांवर पट्टी बांधूनही टाईप करतात. 2014 साली त्यांनी आपला पहिला रेकॉर्ड नोंदवला होता. हे सर्व पराक्रम करण्याआधी विनोद टायपिस्ट म्हणून काम करायचे. यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य टायपिस्ट म्हणून व्यतीत करण्याऐवजी त्यांनी काहीतरी चांगलं करण्याचा विचार केला, ज्यामुळे त्यांची पुस्तकांमध्ये कायमची नोंद होईल.
इतके विश्वविक्रम कसे घडवायचे?
विनोद चौधरी यांनी 47 सेकंदात 103 अक्षरं लिहिण्याचा पहिला विश्वविक्रम केला होता. यानंतर त्यांनी विविध श्रेणींमध्ये अनेक विश्वविक्रम केले. अलीकडेच त्यांनी सीरियल अल्फाबेट टायपिंगमध्ये विश्वविक्रम केला. यात विनोद चौधरी यांनी 27 सेकंदात 26 अक्षरं टाईप केली होती, यामध्ये स्पेस बटणाचाही समावेश होता. हा पराक्रम केल्यानंतर विनोद आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत.
गेल्या काही काळापासून भारतीयांमध्ये विश्वविक्रम करण्याची एक वेगळीच आवड पाहायला मिळत आहे. अलीकडेच, एका भारतीय मुलाने पुरुषांच्या कॅटेगरीत सर्वात लांब केस ठेवण्याचा विक्रम केला होता, ज्याला जगभरातील मीडियाने कव्हर केलं होतं.
हेही वाचा:
Rolls Royce: गजब जुगाड! अवघ्या 45 हजार रुपयांमध्ये मारुती 800 बनली करोडोंची ‘रोल्स रॉयस’; सारेच चकित
[ad_2]