Rajasthan India Success Story Of Manish Sharma Who Left Apple Job And Started Doing Farming In His Own Farm Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : परदेशात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने देखील तरुणांना एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतेच, परंतु परदेशात जाऊन जास्त पैसे देखील कमवता येतात. पण या तरुणाने हे सगळं बाजूला सारुन आईवडिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. तर एवढचं नव्हे तर त्याने अॅपलमधील (Apple) नोकरी सोडून मायदेशी शेती करण्याचा निर्णय घेतला. मनीष शर्मा असं या तरुणांचं नाव आहे. तो आता ब्रिटनमधून (Britain) भारतात (India) आला असून आपल्या गावात तो सेंद्रीय शेती (Farming) करत आहे. त्यामधून त्याला चांगलं उत्पन्न देखील मिळतयं. तर तो गावातील इतर शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती कशी करायची याचं प्रशिक्षण देखील आता देत आहे. 

मनीष शर्मा हा राजस्थानातील नागौर जिल्ह्यात राहणारा तरुण आहे. तो यापूर्वी ब्रिटनमध्ये नामांकित अॅपल कंपनीमध्ये कार्यरत होता. तर त्याचं वार्षिक उत्पन्न हे  72 लाख रुपये होतं. पण आईवडिलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी  शर्माने अॅपलमधील नोकरी सोडली आणि आता पुन्हा गावात येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. सध्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळ तो गावात राहून शेती करत आहे. 

सेंद्रिय पद्धतीने शेती केली सुरू

मनीषने त्याचे प्राथमिक शिक्षण  नागौरच्या सेठ किशनलाल सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने इथेच पूर्ण केलं. त्यानंतर त्याने एमडीएचएसमधून बीबीएची पदवी मिळवली. तर त्याने तीन वर्ष  CAS चा देखील अभ्यास केला. पण त्यानंतर त्याने  CAS सोडले आणि युनाडेट किंगडमधील कार्डिफ विद्यापीठातून IBM, MSC, MBA आणि PHD ची पदवी मिळवली. त्यामुळे मनीषला 72 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह ब्रिटनमधील अॅपल कंपनीत नोकरी मिळाली. 

पण 2020 मध्ये कोरोनाचं संकट आलं. त्याकाळात अनेकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. तर अनेकजण नोकरी मिळवण्यासाठी वणवण भटकत होते. पण मनीषने मात्र आईवडिलांसाठी त्याची अॅपलमधली नोकरी सोडली आणि आपल्या गावी तो परतला. इथे येऊन त्याने सेंद्रीय पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. 

शेतीमधून केली 15 लाखांची कमाई

सध्या मनीष अनेक प्रकारची पिकं त्याच्या शेतामध्ये घेतो. बाजरी, कापूस, जिरे, रब्बी आणि गहू  यांसारखी विविध पिकं त्याच्या शेतामध्ये पिकत असल्याचं मनीषने सांगितलं. तर मागील दीड वर्षामध्ये त्याने सेंद्रीय शेती करुन 15 लाख रुपये कमावले आहेत.

हेही वाचा : 

Kolhapur News : अन् ट्रक थेट संरक्षक कठड्यावरच चढला, करुळ घाटातील थरारा; पाहा व्हिडिओ

[ad_2]

Related posts