Nashik Latest News Health Minister Bharti Pawar Has Sought Report From Nanded Hospital Administration Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : नांदेड शासकीय रुग्णालयातील (Nanded Civil Hospital) घटना अतिशय दुर्दैवी असून अत्यवस्थ, अपघात आणि ईतर आजारांचे रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर औषधांचा तुटवडा नसावा अशी प्राथमिक माहिती आहे, मात्र या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अहवाल मागवला जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी (Bharati Pawar) दिली आहे. 

नांदेडच्या (Nanded) शासकीय रुग्णालयात धक्कादायक 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना सोमवारी समोर आली अन् राज्यभरात खळबळ उडाली. यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी रुग्णालय प्रशासनाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी भारती पवार म्हणाल्या की, नांदेड रुग्णालयात रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून त्या बाबतीत खुलासा मागवला आहे. नेमके कोणते पेशंट होते? कधी ऍडमिट झाले होते? ही सर्व माहिती मागविण्यात आली असून नांदेडसह संभाजीनगरमधील (sambhajinagar) रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची केंद्राकडून दखल घेण्यात आली असून लवकरच सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे भारती पवार यांनी म्हटले आहे. 

भारती पवार पुढे म्हणाल्या की, अनेकदा असं होत की रोड ट्राफिक एक्सीडेंट असतात, इमर्जन्सी असते आणि पेशंट शिफ्ट करता करता पण त्या दुर्दैवी घटना घडतात. त्याचबरोबर काही पेशंट ऍडमिट असतात, काही ऑपरेशनसाठी असतात,ऑपरेशनच्या नंतरच्या काही कारणांमुळे घटना घडत असतात. अजून त्या बाबतीत खुलासा झालेला नाही. अनेकदा इमर्जन्सी पेंशट असतात, यात स्नेक बाईट किंवा ऍक्सीडेन्ट असतात यात पेशंटला दुर्दैवाने मृत्यू येतो. त्यामुळे याबाबतीत सविस्तर खुलासा मागवलेला आहे आणि सर्व प्रकारे केंद्र सरकार राज्यांना आरोग्याच्या बाबतीत मदत करण्यासाठी तत्पर आहे, बजेट देखील त्यासाठी दिला जातो. याबाबतीत माहिती घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे. 

केंद्राकडून राज्यांना निधी दिला जात असतो… 

केंद्र सरकारकडून राज्यांना बजेट दिल जात. ज्याच्यामध्ये तुम्ही औषध पण घेऊ शकतात. आपल्या राज्याला दिलेल आहे, त्यामुळे औषधांचा तुटवड्याबाबत तर काही तक्रार आमच्याकडे नाही. औषधांचा पुरवठा हाफ स्किनच्या माध्यमातून सुरु आहे. त्याचबरोबर प्रक्युरमेन्ट ऑथॉरिटी ती पण खरेदी करणार आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात देखील डीपीडीसीकडे निधी असतो की ज्यामध्ये इमर्जन्सीमध्ये निधी वापरू शकतात. स्थानिक ठिकाणी मेडिकल कॉलेज पण असतं, त्यामुळे ते देखील निर्णय घेतात, त्यामुळे या घटनेत औषधांचा तुटवडा असेल असं प्रथम दर्शनी दिसत नाही. घटनेबाबत सविस्तर खुलासा आल्यावर नेमकी केस आणि कॉज ऑफ डेथ याबाबतीत सविस्तर अहवाल सादर केला जाईल. 

शासकीय रुग्णालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील

राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयाची सध्या दुरावस्था असून यावर बोलताना भारती पवार म्हणाल्या की, एनएमसीच्या गाईडलाईन्स असून त्यांच्याकडून सातत्याने शासकीय रुग्णालयांची तपासणी होत असते. याबाबत एनएमसी अॅक्शन मोडवर काम करत असून अशा ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीने मेडिकल कॉलेज चालत असेल तर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत देखील असं निर्णय घेण्यात आला आहे की जिथे सुविधा नसतील, अशा मेडिकल कॉलेजला परवानगी दिली जाणार नाही. कारण मेडिकल कॉलेज अशी जागा आहे जिथे मुलं शिक्षणासाठी पण येतात आणि पेशंट ट्रीटमेंटसाठी सुद्धा येतात. त्यावर सरकारचं लक्ष आहे. दरम्यान नांदेड प्रकरणी अहवाल मागवण्यात आलेला असून हा अहवाल आल्यानंतर नक्की कारण काय होते किंवा हे मृत्यू कशामुळे झाले याबाबत तपास केला जाणार आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Nanded Government Hospital Incident : मृत्यूचं तांडव सुरुच! नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाणांकडून ट्वीट

[ad_2]

Related posts