Train Accident Viral Video Young Boy Lost His Life While Making A Reel In Front Of A Speeding Train Up Barabanki Live Video Of Death Viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उत्तर प्रदेश: सध्या सोशल मीडियाची (Social Media) क्रेझ तरुणाईच्या डोक्यात घुसली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध (Popular) होण्यासाठी आणि फॉलोअर्स (Followers) वाढवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यासाठी अनेक वेळा लोक आपला जीव देखील धोक्यात घालतात. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात सोशल मीडियामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी येथून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये रील बनवताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

भरधाव ट्रेनची तरुणाला धडक

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये राहणारे काही तरुण व्हिडीओ बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेले. तिथे पोहोचून त्यांनी व्हिडीओ शूटिंग सुरू केलं. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाईक्स मिळविण्यासाठी ते चालत्या ट्रेनजवळ रील काढत होते.

भरधाव वेगात येणारी ट्रेन पाहून एका तरुणाने ट्रेनच्या जवळ जाऊन रील बनवण्याचा विचार केला. त्याचा मित्र देखील त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने शूटिंग सुरू केलं. जशी ट्रेन जवळ आली, तसा हा तरुण ट्रेनच्या आणखी जवळ गेला. त्याला या गोष्टीचा अंदाज नाही आला की, भरधाव वेगात येणारी ट्रेन त्याला धडक देईल. शेवटी ट्रेनने मुलाला धडक दिली आणि तिथेच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रेल्वे अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

रील बनवण्याच्या चक्करमध्ये या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड झाला, जो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच बाराबंकी रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं आणि मृतदेह मुलाच्या कुटुंबाकडे सोपावण्यात आला. सध्या पोलीस मुलाच्या मित्रांची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचं नाव फरमान आहे, ज्याला रील बनवण्याचा नाद होता. हा मुलगा केवळ 16 वर्षांचा होता. या मुलाला रील बनवण्याचं इतकं वेड लागलं होतं की, हा मुलगा जिथे पण जायचा, तिथे रील बनवणं सुरू करायचा. रील बनवण्याच्या नादात या मुलाचा दुर्दैवी अंत झाला.

हेही वाचा:

VIDEO: बाल्कनीत उभे राहून भांडता-भांडता तोल गेला; जोडपे तिसऱ्या मजल्यावरुन कोसळून थेट रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल



[ad_2]

Related posts