Delhi Sakshi Murder Case Inside Story Her Boyfriend Sahil Attacked Her 40 Times; क्षुल्लक वाद अन् चाकू-दगडाने ४० वार… दिल्लीतील साक्षी हत्याकांडची Inside Story

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरली आहे. येथे साक्षी नावाच्या एका अल्पवयीन मुलीची अत्यंत क्रूरपणे चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. साक्षीची हत्या करणाऱ्या तरुणाचं नाव साहिल असल्याची माहिती आहे. पोलिसांनी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली आहे. साक्षीचा साहिलसोबत वाद झाला आणि त्यामुळे तो इतका संतापला की त्याने तिच्यावर चाकू आणि दगडाने हल्ला करुन तिचा जीव घेतला.साहिलने साक्षीवर तब्बल ४० वेळा वार केले. धक्कादायक म्हणजे साहिल जेव्हा तिला मारत होता तेव्हा कोणीही मध्ये पडून तिला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. इतकंच नाही तर तिला मारल्यानंतर साहिल हा घडनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी देखील झाला.

दारात मांडव, घरात आनंद; तेवढ्यात अनर्थ घडला, लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी नवरदेवाचा मृत्यू
या निर्घृण हत्येबाबत दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि साहिल हे रिलेशनशिपमध्ये होते. आदल्या दिवशी काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. याचाच राग मनात धरत साहिलने साक्षीला मारण्याचा निर्णय घेतला. साहिलने चाकू सोबत नेला होता आणि हल्ला करताना त्याने साक्षीला पळून जाण्याची किंवा स्वत:चा जीव वाचवण्याची संधीही दिली नाही, त्यामुळे तो तिला मारण्याच्या उद्देशानेच आला होता, हे स्पष्ट होतं. जेव्हा साहिल साक्षीवर हल्ला करत होता तेव्हा एका तरुणाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. मात्र, आरोपी साहिल इतका चिडलेला होता की त्याने त्या तरुणाला दूर ढकललं.
कवटीत चाकू भोसकला, दगडाने वारंवार वार

साहिलने थेट पीडितेच्या डोक्यात चाकूने वार करण्यास सुरुवात केली. एकामागून एक त्याने सुमारे ४० वेळा तिच्या डोक्यात वार केले. त्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने साक्षी खाली कोसळली. पण, इतकं होऊनही साहिलचा राग शांत झालेला नव्हता. त्याने बाजूलाच असलेला नाल्यावर झाकलेला एक मोठा दगड उचलला आणि दगडाने तिला ठेचले.

साक्षीला इतक्या निर्घृणपणे संपवल्यानंतर तो गर्दीतून मोठ्या ऐटीत बाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा परतला आणि तिच्या पुन्हा दगडाने वार करण्यास सुरुवात केली. त्याला साक्षीला कुठल्याही परिस्थितीत जिवंत सोडायचं नव्हतं. जेव्हा त्याला साक्षीच्या शरीराची कुठलीही हालचाल होत नसल्याचं खात्री झाली तेव्हा तो तिथून पळून गेला.

स्थानिक पुढाऱ्यांना घाम फोडणाऱ्या नेत्याची पुण्यात गोळ्या घालून हत्या

तोपर्यंत परिसरातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मृताच्या नातेवाइकांना कळवण्यात आले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्याचवेळी आरोपीचा शोध सुरू केला असता त्याने मोबाईल बंद केल्याचे आढळून आले. यानंतर साहिलच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. अखेर साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक करण्यात आली.

[ad_2]

Related posts