आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक, मनिष सिसोदिया नंतर दुसरी मोठी कारवाई

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : कथित दारु विक्री धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने (ED) दिल्लीत आणखी एक कारवाई केली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh of AAP arrested) यांना दिल्लीतीन नवीन दारू विक्री धोरण (Delhi Liquor Policy Case) प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आज सकाळीच ईडीने त्यांच्यावर धाड टाकली होती. त्यानंतर दुपारनंतर ईडीने त्यांना अटक केली. यापूर्वी याचप्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या जेलमध्ये आहेत.

 

दिल्लीतील नवीन दारू विक्री धोरण प्रकरण नेमकं काय? What is Delhi Liquor Policy Case? 

दिल्लीतील नवीन दारु विक्री धोरण सध्या देशभरात गाजत आहे. दिल्लीतील नवीन विक्री धोरणाचं हे प्रकरण 2021 मधील आहे.सध्या जरी हे विक्री धोरण रद्द करण्यात आलं असलं तरी त्याची चौकशी आणि कारवाईचा ससेमिरा अजूनही सुरु आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने 2021 मध्ये मद्यविक्रीसाठी नवीन धोरण तयार केले होते. मात्र हे धोरणच बोगस आणि घोटाळेबाज असल्याचा आरोप, भाजपसह विरोधकांनी केला होता. याबाबतच्या वादावादीनंतर केजरीवाल सरकारने हे धोरण मागे घेत रद्द केलं. 

नव्या धोरणातून राज्याचं उत्पन्न वाढलं

नव्या मद्य विक्री धोरणामुळे केजरीवाल सरकारच्या उत्पन्नात लक्षणीय अशी 27 टक्के वाढ झाली होती. ज्यामुळे सुमारे 8,900 कोटींचे उत्पन्न दिल्ली सरकारला मिळालं होतं. 

याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी या प्रकरणात गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त केली. या धोरणाविरोधात उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरासह 31 ठिकाणी छापे टाकले होते.

आधी मनिष सिसोदियांना अटक 

यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना फ्रेबुवारी 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. सिसोदिया यांची आधी सीबीआयने चौकशी केली त्यांनतर त्यांना अटक केली. याचप्रकरणात ईडीनेही उडी घेत, चौकशी आणि धाडसत्र सुरु केलं आहे.दिल्लीच्या मद्य धोरणाच्या संबंधित केसच्या चौकशीसाठी सीबीआयने सिसोदिया यांना बोलावले होते. जवळपास आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली.

 



[ad_2]

Related posts