[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Apple job : आई-वडिलांसोबत राहण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी एकानं परदेशातील तब्बल 72 लाखांची नोकरी सोडलीय. मनीष शर्मा असं त्या व्यक्तिचं नाव आहे. मनिष शर्मा (Manish Sharma) हे राजस्थानमधील (rajasthan) नागौर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शर्मा यांना ब्रिटनमध्ये अॅपल कंपनीत 72 लाखांची नोकरी होती. मात्र, ती नोकरी सोडून ते सध्या सेंद्रीय शेती करत आहेत.
मनीष शर्मा सेंद्रीय शेतीतून मिळवतायेत चांगला नफा
याबाबत शेतकरी मनीष शर्मा सांगतात की, त्याला त्याच्या आई-वडिलांसोबत राहायचे होते, पण ब्रिटीश सरकारनं आई-वडिलांसोबत राहण्यास परवानगी दिली नाही. अशा परिस्थितीत मनीष शर्मा यांनी नोकरी सोडून गावात येऊन सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. अनेक लोक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळण्याचे स्वप्न पाहतात. कारण ते अधिकाधिक पैसे कमवू शकतील. पण मनीष शर्मा यांनी लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारली आहे. मनीष शर्मा हे आता ब्रिटनमधून भारतात आले आहेत. आपल्या गावात त्यांनी सेंद्रिय शेती सुरु केली आहे. त्यातून त्याला चांगले उत्पन्नही मिळत आहे. आता तो इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देत आहे.
अॅपल कंपनीत वार्षिक 72 लाख रुपयांचे पॅकेज
मनीष शर्मा यांनी ब्रिटनमधील अॅपल कंपनीत वार्षिक 72 लाख रुपयांचे पॅकेज होते. पण आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी मनीष शर्माने अॅपलमधील नोकरी सोडली. आता पुन्हा गावात येऊन शेती करत आहेत. दीड वर्षांहून अधिक काळ शेती करण्यात गेला. त्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. मनीष शर्मा यांनी आपले शिक्षण नागौरच्या सेठ किशनलाल सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी येथे पूर्ण केले. त्यानंतर एमडीएचएसमधून बीबीए केले.
मनीष शर्मा यांनी 3 वर्षे CAS केले. त्यानंतर त्यांनी कार्डिफ विद्यापीठ UK मधून IBM, MSC, MBA आणि PHD चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर मनीषला 72 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह ब्रिटनमधील अॅपल कंपनीत नोकरी मिळाली. दरम्यान, 2020 मध्ये कोरोनाचा काळ आला. लोक त्यांच्या नोकऱ्या गमावत होते. लोक नोकऱ्यांसाठी इकडे-तिकडे भटकत होते. पण मनीषने आई-वडिलांची सेवा करण्यासाठी अॅपलमधील नोकरी सोडली. नागौरला परत आले आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करायला सुरुवात केली.
सेंद्रिय शेतीतून दीड वर्षात 15 लाखांचे उत्पन्न
मनीष शर्मा हे सध्या अनेक प्रकारची पिके घेत आहेत. ते बाजरी, कापूस, जिरे, रब्बी आणि गहू यासह विविध प्रकारची पिके घेत आहेत. याशिवाय ते 40 प्रकारच्या भाज्याही पिकवत आहे. मनीष सांगतात की, गेल्या दीड वर्षात सेंद्रिय शेती करुन 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Success Story : फक्त 10 गुंठ्यात वांग्याची शेती, नफा मिळवतोय लाखोंचा; युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
[ad_2]