Khadi Products Sale On Gandhi Jayanti At Khadi Bhawan In Connaught Place In Delhi At Record High 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Khadi Sales: गांधी जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti) यावर्षी खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीने सर्व विक्रम मोडले आहेत. राजधानी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे असलेल्या खादी भवनमध्ये 1.52 कोटी रुपयांच्या खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री झाली आहे. आतापर्यंतची ही विक्रमी विक्री झाली आहे. 2022 मध्ये गांधी जयंतीला एकूण 1.34 कोटी रुपयांची विक्री झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खादी उत्पादन खरेदी करण्याचं आवाहन

गांधी जयंतीनिमित्त खादी उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यंदाही तेच घडले आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी गांधी जयंतीनिमित्त, कॅनॉट प्लेसमधील खादी उत्पादनाची विक्री 1,52,45,000 रुपये झाली आहे. तर 2022-23 मध्ये गांधी जयंतीला 1.34 कोटी रुपयांची आणि 2021-22 मध्ये 1.01 कोटी रुपयांची विक्री झाली होती. खादी उत्पादनांच्या विक्रमी विक्रीवर, KVIC (खादी आणि ग्रामोद्योग आयोग) चे अध्यक्ष मनोज कुमार यांनी गांधी जयंतीच्या दिवशी खादीच्या विक्रमी विक्रीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रँड पॉवरला दिले आहे. ते म्हणाले की 24 सप्टेंबर 2023 च्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी गांधी जयंतीनिमित्त देशवासियांना खादी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाचा व्यापक परिणाम झाला आहे.

24 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात गांधी जयंतीनिमित्त देशवासियांना खादी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, सणासुदीला सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण काही ना काही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असेल. अशा परिस्थितीत लोकल फॉर व्होकलचा मंत्र लक्षात ठेवून त्यांनी देशवासीयांना मेड इन इंडिया उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले की तुम्ही खरेदी केलेल्या भारतीय वस्तूंचा थेट फायदा आमचे कामगार, कारागीर आणि इतर विश्वकर्मा बंधू भगिनींना होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

खादी ग्रामोद्योग आयोगाला ट्रेडमार्क कायद्यानुसार हायकोर्टाचा दिलासा; मुंबईतील संघटनेला ‘खादी’ हे नाव, ‘चरखा’ हे चिन्ह वापरण्यास मनाई

 

 

 

[ad_2]

Related posts