Pune News 70 Confirmed And 638 Suspected Patients Pune Records Highest Dengue Cases In September

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात चाल वर्षातील सर्वाधिक उच्चांकाने सप्टेंबर महिन्यात (Dengue) डेंग्यूच्या सर्वाधिक (Pune Dengue News ) रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. रोगराई पसरवण्यासाठी जबाबदार असलेल्या गोष्टींवर कारवाई करुनही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी (Pune news) काळजी घ्यावी, असं आवाहन कऱण्यात आलं आहे. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे 70 रुग्ण आणि 683 संशयित रुग्ण आढळून आले. या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची संख्या सप्टेंबरमध्ये होती. रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरलेल्या अशा 174 कंपन्यांवर महापालिकेने गेल्या महिन्यात कारवाई केली असून उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण 18,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्यांदा निदान झालेल्या रुग्णांची संख्या ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. एकाच वर्षभरात दोन वेळा डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे. डास उत्पत्तीची ठिकाणे शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. 

ही काळजी नक्की घ्या…

– डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घरातील पाण्याचे भांडे आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ  करा.
– घरांमधील पाण्याची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करा.
– घराभोवती साचलेले पाणी सोडणं टाळा.
– वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधक जाळी वापरा.
– वैयक्तिक स्वच्छतेचा सराव करा आणि परिसर स्वच्छ ठेवा.
– घरामध्ये आणि आजूबाजूला न वापरलेल्या किंवा अनावश्यक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्याची खात्री करा.
– वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणी आणि कीटकनाशक उपचार केलेल्या बेड नेटचा वापर केला जाऊ शकतो.

आपल्या परिसरात स्वच्छता राखा…

या सगळ्या रोगांचा सामना करण्यासाठी डासांची प्रजनन होईल त्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी ठिकाणं तत्काळ नष्ट करण्यासह प्रतिबंधात्मक  योजना तयार करण्यात आली आहेशिवाय डेंग्यू चाचणी किट महानगरपालिकेचे दवाखाने आणि आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहेत. नागरिकांनी नियमित तपासणी आणि तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबतच पाण्याचे डबे स्वच्छ करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे, अत्यावश्यक आहे. आपल्या परिसरात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि उष्णतेशी संबंधित आजारांच्या वाढत्या धोक्याची महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर महत्वाची बातमी-

Health Tips : तुमच्या मुलांना डेंग्यूपासून दूर ठेवायचंय? ‘या’ टिप्स फॉलो करा; रोगापासून सुरक्षित ठेवा

[ad_2]

Related posts