Crude Oil Price Slip Sharply Below 85 Dollar Per Barrel On Global Demand Concern

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crude Oil Price: भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर (Crude Oil Price) प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली गेले आहेत. एका दिवसात कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल 5 डॉलरची घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीमुळं कच्च्या तेलाच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. व्याजदर चढेच राहण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत.

सात दिवसात कच्च्या तेलांच्या किंमतीत 13.35 टक्क्यांची वाढ

28 सप्टेंबर 2023 रोजी ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 97.5 डॉलरवर पोहोचले होते. अवघ्या एका आठवड्यात किंमती 84.48 प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या आहेत. म्हणजेच या काळात कच्च्या तेलाच्या किमती 13.35 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळं भारत सरकारच्या तेल कंपन्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर तोटा सहन करावा लागत होता. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे झालेल्या नुकसानावर मात करण्यात त्यांना यश मिळणार आहे. सौदी अरेबिया आणि रशियाच्या नेतृत्वाखालील प्रमुख तेल उत्पादक देशांनी किमती वाढवण्यासाठी पुरवठ्यात कपात केली आहे. सौदी अरेबिया आणि रशियाने डिसेंबर 2023 पर्यंत उत्पादन पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक मागणीत घट होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहणे आयातदारांच्या हिताचं

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहणे हे तेल उत्पादक आणि वापरणाऱ्या देशांच्या हिताचे आहे. कच्च्या तेलाच्या आयातीबरोबरच भारत कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणानंतरही निर्यात करणारा मोठा देश आहे. अर्धे जग आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जग महागाईशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने संकट आणखी गडद होऊ शकते. 2008 प्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यास किमती पुन्हा कोसळू शकतात, असे ते म्हणाले. OPEC आणि OPEC + देशांनी 2022 पर्यंत कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज 4.96 दशलक्ष बॅरलने कमी केले. त्यानंतर ब्रेंट क्रूड तेलाची किंमत जूनमध्ये प्रति बॅरल  72 डॉलरवरुन 97 प्रति बॅरल झाली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती उत्पादक देशांच्या हिताच्या नाहीत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर (Crude Oil Price) प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणे तर दूर आता भडका उडण्याची भीती

 

 

[ad_2]

Related posts