Women Farmers News Bihar Gaya Sabalpur Village Women Farmers Earning Bumper Profit By Cow Farming

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

women Farmers : सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. नोकरी, व्यवसाय, शेती, राजकारण किंवा समाजसेवा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला काम करतायेत. आज आपण अशाच स्वावलंबी गावातील महिलांच्या संदर्भातील माहिती पाहणार आहोत. बिहारमधील गया जिल्ह्यातील सबलपूर गावातील सर्व महिला या गायीच्या दुधाचा व्यवसाय करत आहेत. दुधाच्या व्यवसायातून महिला महिन्याला लाखोंचा नफा कमवत आहेत.   

सबलपूर गावातील प्रत्येक घराबाहेर गायींसाठी शेड

सबलपूर गावातील प्रत्येक घराबाहेर गायींसाठी शेड बांधले आहे. यामध्ये महिला गायी सांभाळत आहेत. चारा काढणे, दूध काढणे, दूध संघापर्यंत दूध पोहोचवणे ही सर्व कामे महिला स्वतः करत आहेत. सुरुवातीला एका महिलेनं एका गायीपासून सुरुवात केली होती. आज या  संपूर्ण गावासाठी उत्पन्नाचा स्रोत गायी बनल्या आहेत. हे पाहून आजूबाजूच्या गावातील महिलांही आता त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत.

महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली 

बिहारमधील गया जिल्ह्यातील सबलपूर गावातील महिला स्वावलंबी होत आहेत. गायपालनातून महिला मोठा नफा कमवत आहेत. या महिला घरी बसून दरमहा लाखोंचा नफा कमावत आहेत. अल्पावधीत चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांच्या घरची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. या गावातील महिलांची मुले चांगल्या खासगी शाळेत शिक्षण घेत आहेत. सबलपूर गावातील महिला पशुपालनाची सर्व कामे स्वत: करतात. त्यांच्या घराबाहेर जनावरांचे शेड बांधून गायी पाळतात. चारा देणे, दूध काढणे, दूध समितीपर्यंत पोहोचवणे ही सर्व कामे त्या स्वतः करतात. सुरुवातीला एका महिलेच्या गायी पाळण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता संपूर्ण गावासाठी उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. 

यंत्राच्या सहाय्याने महिला गाईचे दूध काढतात

गायींचे पालनपोषण करणाऱ्या महिलेपैकी एक असलेल्या प्रियंका कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला स्वत: दूध संघात जाऊन आपले दूध विकतात. गावातील सर्व महिला गायी पाळतात आणि गायींचे दूध विकतात. यंत्राच्या सहाय्याने महिला गाईचे दूध काढतात. कधी कधी हाताने देखील महिला दूध काढतात. प्रियंका कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला गायी पाळण्याबरोबरच घरातील सर्व कामे करत आहेत. आता या महिलांना गाय पालनातून चांगला नफा मिळत आहे.  प्रियांकाकडे यापूर्वी तीन गायी होत्या. ज्यातून त्यांना 35 हजार रुपये मिळत होते. आता त्यांच्याकडे चार गायी आहेत. आता त्यांना 40 ते 45 हजार रुपये मिळत आहेत. यातील 15 हजार रुपये गाईला चारा देण्यासाठी खर्च केले जातात, उर्वरित पैसे त्यांच्याकडे शिल्लक राहतात अशी माहिती प्रियंका कुमारी यांनी दिली.

शेतीसाठी सेंद्रिय खतांचाही वापर केला जातो 

या गावातील बेबी देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पशुपालनामध्ये खूप फायदा होतो. शेणापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. जे शेतात वापरले जाते. बेबी देवी यांनी सांगितले की, गायी पाळण्याआधी ती शेतीची कामे करायची. त्यानंतर त्यांनी गाय पाळण्यास सुरुवात केली. ज्यामुळं त्यांना भरपूर नफा झाला आणि त्यांचा घरखर्च सहज भागू लागला.

महत्त्वाच्या बातम्या:

Buffalo : सर्वात जास्त दूध देणारी म्हैस कोणती? दिवसाला देते ‘एवढं’ दूध; वाचा सविस्तर

[ad_2]

Related posts