PM Kisan Mandhan Yojana Know How To Get Profit And Apply Method

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांसाठी (Farmers) केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यात येते. अशीच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana ). या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन देते. या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती…

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अधिकृत साइटला भेट देऊन नोंदणी करावी. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत. गुंतवणुकीची रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते. तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केल्यास दरमहा तुम्हाला 55 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी अर्ज केल्यास तुम्हाला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते. 

दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात

तुम्ही जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊन अर्ज करु शकता. यानंतर तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे VLE ला द्यावी लागतील. त्यानंतर तो तुमचा अर्ज योजनेत समाविष्ट करेल. याशिवाय, प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही स्वतः योजनेसाठी अर्ज करू शकता. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

पीएम किसान मानधन योजनेबद्दल माहिती

दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन असणे आवश्यक 
अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे
आधार कार्ड
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
ओळखपत्र
वय प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक

या योजनेसाठी अशी करा नोंदणी 

सर्व प्रथम, आपण अधिकृत वेबसाइटवर जा आणि लॉगिन करा
अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा फोन नंबर अपडेट करावा लागेल
त्यानंतर उमेदवाराने आवश्यक ती माहिती भरावी 
त्यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा 
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल
यानंतर तो OTP टाका
त्यानंतर अर्ज सबमिट करा

महत्त्वाच्या बातम्या:

PM Kisan Yojana : PM किसानचा 15 वा  हप्ता मिळणापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित

[ad_2]

Related posts