Gold Silver Rate On 6 October 2023 In Gold Silver Price Dips In Mcx Check City Wise Price

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Silver Rate : सोनं चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आज सोने चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही संधी आहे. आज सुरुवातीच्या टप्प्यात सोन्याचा भाव हा 56 हजार 735 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर सुरु झाले. त्यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी घसरण दिसून आली आणि दुपारी 12 वाजेपर्यंत सोन्याचा भाव कालच्या तुलनेत 22 रुपयांनी म्हणजेच 0.04 टक्क्यांनी स्वस्त झाले. सध्या सोन्याचा दर हा 56 हजार 586 रुपयांवर व्यवहार करत आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 56 हजार 608 रुपयांवर बंद झाला.

चांदीच्या किंमतीत घट

शुक्रवारी सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही थोडीशी घसरण दिसून आली आहे. आज सुरुवातीला चांदीची 66 हजार 825 रुपये प्रति किलोनं विक्री सुरु होती. त्यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी घसरण दिसून आली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीचे दर 31 रुपयांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी 66 हजार 737 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. 5 ऑक्टोबर रोजी चांदीचे दर हे 66 हजार 768 रुपयांवर बंद झाले होते.

महत्त्वाच्या 10 मोठ्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर 

चेन्नईमध्ये – 24 कॅरेट सोने 57,650 रुपये, चांदी 73,000 रुपये प्रति किलो
कोलकाता –  24 कॅरेट सोने 57,230 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो
दिल्लीत –  24 कॅरेट सोने 57,380 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो
मुंबईत –  24 कॅरेट सोने 57,230 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो
लखनौ –  24 कॅरेट सोने 57,380 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो
पाटण्यात –  24 कॅरेट सोने 57,280 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो
नोएडा –  24 कॅरेट सोने 57,380 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो
गाझियाबाद –  24 कॅरेट सोने 57,380 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो आहे.
जयपूर –  24 कॅरेट सोने 57,380 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो
गुरुग्राम –  24 कॅरेट सोने 57,380 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण 

देशांतर्गत बाजाराशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीचे दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात सोने 1.3 टक्क्यांनी स्वस्त झाले होते. तर अमेरिकेत सोने 0.3 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. दरम्यान, पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! लग्नसराई-सणासुदीसाठी सोने खरेदी करायचीय? सविस्तर जाणून घ्या

 

[ad_2]

Related posts