Weather Update IMD Predicts Heavy Rainfall In These Parts Of India Till Oct 8 Maharashtra Mumbai Monsoon

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Forecast : देशात आज आणि उद्या पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळणार आहे. देशात (India Weather Update) काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे. देशासह राज्यातूनही (Maharashtra Monsoon Update) मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हवामाना विभागाच्या अंदाजानुसार, देशात रविवारपर्यंत देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातही विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत मात्र, तापमान वाढलं असून तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळणार आहे.

पुढील 24 तास परतीच्या पावसाचा धुमाकूळ 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी 8 ऑक्टोबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भाग वगळता इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे  आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. राजस्थान, गुजरातसह देशाच्या विविध भागांतून मान्सूनं आधीच टाटा-बाय बाय केलं आहे.

[ad_2]

Related posts