MS Dhoni Bike Ride Enjoying In Mumbai Video Viral On Social Media

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MS Dhoni Trending Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचं (MS Dhoni) बाईक्सवरील प्रेम कोणापासूनही लपलेलं नाही. महेंद्र सिंह धोनी अनेकदा बाईक चालवताना दिसला आहे. अशातच पुन्हा एकदा धोनीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महेंद्र सिंह धोनी बाईकवरुन जाताना दिसत आहे. मात्र, यावेळी महेंद्र सिंह धोनी बाईकच्या मागच्या सीटवर बसल्याचं दिसत आहे आणि बाईक दुसरा कुणीतरी चालवत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ मुंबईमधील आहे.

सोशल मीडियावर धोनीचा व्हिडीओ व्हायरल

महेंद्र सिंह धोनीचा बाईकवरुन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्स या व्हिडीओवर जोरदार कमेंट करत आहे. क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटरचा हा व्हिडीओ फार आवडला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या या व्हिडिओला आणि त्याच्या साधेपणाला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

धोनीची उल्लेखनीय कामगिरी

धोनीच्या नेतृत्वात (Dhoni Captaincy) टीम इंडियाने इतिहास रचला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप आणि वनडे कपही जिंकला आहे. यासोबत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीही आपल्या नावे केली. 2007 मध्ये धोनीला क्रिकेटच्या सर्व प्रकारातील टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि 2017 पर्यंत त्याने कर्णधारपदाची भूमिका बजावली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी आयपीएलमध्ये त्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतो.

कर्णधार म्हणून धोनीचे विक्रम

भारताने धोनीच्या नेतृत्वात 2010 आणि 2016 आशिया चषक, ICC क्रिकेट विश्वचषक 2011 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 यासह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. धोनीचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. धोनीने  199 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. यापैकी 110 सामने भारताने जिंकले, 74 गमावले आणि 5 बरोबरीत राहिले. कसोटी क्रिकेटच्या 60 सामन्यांमध्ये धोनीने भारताचं नेतृत्व केलं, यातील 27 सामने त्यांने जिंकले, 18 गमावले आणि 15 अनिर्णित राहिले.

तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार

भारताने 2013 मध्ये इंग्लंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पावसामुळे रोमांचक ठरलेला हा सामना टीम इंडियाने पाच धावांनी जिंकला आणि धोनी तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2011 आणि टी-20 वर्ल्ड कप 2007 ही जिंकला. अद्याप कोणत्याही भारतीय कर्णधाराला ही कामगिरी करता आलेली नाही. ‘कॅप्टल कूल’चा हा रेकॉर्ड आजही कायम आहे.

हेही वाचा:

VIDEO: चालत्या ट्रेनमध्येच काका थिरकले; पाहून शाहरुख खानच्या चल छैय्या छैय्याची येईल आठवण, पाहा व्हिडीओ



[ad_2]

Related posts