Gaganyaan Crew Escape System Test This Month End 25 Or 26 October Test Vehicle Is In Final Stage Of Preparation Isro Space Mission

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ISRO Gaganyaan Module Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजे इस्रो (ISRO) पहिल्या मानवी मोहिमेसाठी सज्ज आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या (Moon Mission) यशानंतर आता गगनयान मोहिमेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इस्रोच्या महत्वाकांक्षी गगनयान (Gaganyaan) मोहिमेची तयारी सुरु असून या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. गगनयान मोहिमेसाठीची महत्वाची चाचणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अबॉर्ट टेस्ट

इस्रोला गगनयानसाठी पहिले क्रू मॉड्यूल मिळालं असून त्याची पहिली अबॉर्ट चाचणी  (Abort Test) 25-26 ऑक्टोबर या काळात करण्यात येण्याची शक्यता आहे. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ऑक्टोबरच्या अखेरीस गगनयान मोहिमेसाठी क्रू एस्केप सिस्टमची अबॉर्ट टेस्ट (Crew Escape System Abort Test) घेण्यास सज्ज आहे.

इस्रोच्या गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट

अबॉर्ट टेस्टमध्ये सुमारे 17 किमी उंचीवर चाचणी वाहनापासून क्रू मॉड्यूल वेगळे होणे अपेक्षित असेल. गगनयान मोहिमेत जर कोणतीही अडचण आली तर, अंतराळवीरांना मॉड्यूलसह सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी क्रू मॉड्यूल अबॉर्ट टेस्ट केली जात आहे. ही चाचणी यशस्वी  झाल्यास गगनयान मोहिमेसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल.

कशी असेल अबॉर्ट टेस्ट?

या चाचणीमध्ये गगनयानचं मॉड्यूल अवकाशात भरारी घेईल. त्यानंतर ठराविक उंची गाठल्यानंतर हे क्रू मॉड्यूल लाँच व्हेईकलपासून वेगळं होऊन समुद्रात लँड होईल. बंगालच्या उपसागरात क्रू मॉड्यूलने टचडाउन केल्यानंतर, भारतीय नौदलाचे जहाज आणि डायव्हिंग टीम वापरून क्रू मॉड्यूल पुन्हा ताब्यात घेईल.

इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम

इस्रोच्या गगनयान मोहिमेचे तीन टप्पे असणार आहेत. यामध्ये दोन वेळा मानवरहित अंतराळयान अवकाशात पाठवलं जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या वेळी मानवाला अवकाशात पाठवलं जाईल. सुरुवातीच्या अंतराळ मोहिमेत इस्रो व्योमित्र नावाचा रोबोट अंतराळात पाठवणार आहे. मानवासाठी या मोहिमेची सुरक्षितता तपासण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी आधी रोबोट अवकाशात पाठवला जाईल.

महत्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts