नैनीतालमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uttrakhand Nainital Bus Accident : उत्तराखंड (Uttrakhand) च्या नैनीताल (Nainital) मध्ये भीषण बस अपघात (Bus Accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. नैनीतालच्या नालनी परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. नैनीतालमध्ये गेलेली पर्यटक बस दरीत कोसळून हा अपघात घडल्याची माहिती आहे. या बसमध्ये 30 ते 32 प्रवाशी होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातातील सात मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ (SDRF) और एनडीआरएफ (NDRF) टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

बस दरीत कोसळून अपघात

कालाधुंगी रोडवरील नालनी येथे बस दरीत कोसळल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्ष नैनितालकडून एसडीआरएफला देण्यात आली होती. या बसमध्ये 30 ते 32 जण असण्याची शक्यता आहे. बस दरीत कोसळली आहे, ही माहिती एसडीआरएफ पथकाला मिळाली. एसडीआरएफ कमांडंट मणिकांत मिश्रा यांच्या सूचनेनुसार, पोस्ट रुद्रपूर, नैनिताल आणि खैरना येथील एसडीआरएफ बचाव पथके तातडीने बचावासाठी घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर एसडीआरएफ पथकाला आढळलं की, या बसमध्ये 32 लोक होते. हे हरियाणातील हिसार येथून नैनितालमध्ये फिरण्यासाठी आले होते.

हरियाणातून नैनीताल फिरण्यासाठी आलेल्या बसला अपघात

नैनितालचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) प्रल्हाद नारायण मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”बसमध्ये 30-32 लोक होते. या बसमध्ये शाळेतील शिक्षक आणि मुलं होती. हे सर्व नैनीताल येथे फिरण्यासाठी आले होते. हरियाणातील हिसार येथे जात असताना हा अपघात झाला. आम्ही आतापर्यंत 25 लोकांना वाचवले आहे.”

 

महत्वाच्या इतर बातम्या : 

 



[ad_2]

Related posts