[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचं सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही, राष्ट्रवादीमध्ये (Nationalist Congress Party) हेच सुरू होतं असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) गटाने केला. शरद पवार श्हे(Sharad Pawar) घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, पक्षात लोकशाहीचा अभाव होता असा मोठा दावा अजित पवार गटाने केला आहे. तसेच आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर आज पुन्हा सुनावणी सुरू असून अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येत आहे.
अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल (Neeraj Kishan Kaul) आणि मनिंदर सिंह (Maninder Singh) हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Singhvi) हे युक्तिवाद करणार आहेत.
[ad_2]