Rajasthan Assembly Election Opinion Poll 2023 ABP C Voter Survey For Rajasthan Election 2023 BJP Congress

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajasthan ABP C-Voter Opinion Poll 2023 :  राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा (Rajasthan Assembly Election) बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) आज राजस्थान विधानसभेची निवडणूक जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजपने (BJP) राज्यात 41 उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे एबीपी न्यूज आणि सी-व्होटरचा मतदानपूर्व सर्वेचा कल समोर आला आहे. या सर्वेत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. 

राजस्थानमधील सर्व 200 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 23 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी मतदार सत्ता बदल करते. मागील काही वर्षांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ता आलटून पालटून येते. ओपिनियन सर्वेमध्ये  राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणते सरकार स्थापन होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना विचारण्यात आला होता. 

2018 मध्ये, 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेच्या 199 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून रिंगणात होता. 39.8 टक्के मतांसह 99 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 100 जागांच्या बहुमताच्या आकड्यासाठी काँग्रेसला केवळ एक जागा कमी पडली. तेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप मतांच्या संख्येत अल्प फरकानं मागे पडला होता. काँग्रेसच्या 39.8 टक्के मतांच्या तुलनेत भाजपची मतं 39.3 टक्के होती. तर, निवडणुकीत भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या.

राजस्थानमध्ये झालेल्या या ओपिनियन पोलमध्ये जनता काँग्रेसचे सरकार परत आणणार की पंतप्रधान मोदींच्या नावावर भाजप सत्ता काबीज करणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वेक्षणात आश्चर्यजनक बाब समोर आली. 

सर्वेक्षणातील कलानुसार,  राजस्थानमध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. सर्वेक्षणानुसार, यावेळी राजस्थानमधील 200 जागांपैकी काँग्रेसला 59-69 जागा, भाजपला 127-137 जागा मिळू शकतात तर इतरांना 2-6 जागा मिळू शकतात.

मतांची टक्केवारी किती राहणार?

ओपिनियन पोलनुसार, यावेळी राजस्थानमध्ये काँग्रेसला 42 टक्के, भाजपला 47 टक्के तर इतरांना 11 टक्के मते मिळत आहेत.

राजस्थानच्या ओपिनियन पोलनुसार कोणाला किती टक्के मते?

स्रोत- सी व्होटर

राजस्थान
एकूण जागा – 200

काँग्रेस-42 टक्के
भाजप-47 टक्के
इतर – 11 टक्के

राजस्थानच्या ओपिनियन पोलमधील जागांची आकडेवारी

स्रोत- सी व्होटर

राजस्थान
एकूण जागा – 200

काँग्रेस-59-69
भाजपा-127-137
इतर -2-6

( Disclaimer : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराममध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने ओपिनियन पोल घेतला आहे. त्यात सुमारे 90 हजार लोकांशी संवाद साधण्यात आला आहे. हे मतदानपूर्व सर्वेक्षण 1 सप्टेंबरपासून ते  8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.)

इतर संबंधित बातम्या :

[ad_2]

Related posts