Weather Update Imd Alert Heavy Rains In These States Till October 12 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Forecast Today : देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरी देशाच्या काही भागांत पावसाची हजेरी (IMD Rain Prediction) पाहायला मिळत आहे. गुजरात (Gujrat), राजस्थानसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून माघारी परतला आहे. मुंबईतही नैऋत्य मान्सून माघारी परतल्याने तापमान वाढ पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विदर्भातून मान्सून माघारी परतला आहे.

‘या’ भागात पुन्हा पावसाची हजेरी

दरम्यान, देशाच्या काही भागांत महिना भर दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर भागात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, सिक्कीम, पश्चिम बंगालसह, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

12 ऑक्टोबरपर्यंत विविध भागात पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार 12 ऑक्टोबरपर्यंत देशात विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, पश्चिम बंगाल (West Bengal) आणि सिक्कीम (Sikkim), अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh), आसाम (Assam), मेघालय (Meghalaya), कर्नाटक (Karnataka), तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), पुद्दुचेरी (Puducherry) मध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच 12 ऑक्टोबरपर्यंत या भागाता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

12 ऑक्टोबरनंतर तुरळक ठिकाणी पाऊस

हवामान विभागाने वर्तवलेल्या (IMD) अंदाजानुसार, 12 ऑक्टोबरनंतर दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि बेटांवर 2 दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत पूर्व भारतातील काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज असून  देशातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

येत्या दोन दिवसांत मान्सून माघारी परतणार

येत्या दोन दिवसांत विविध राज्यांतून नैऋत्य मान्सून माघारीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD च्या माहितीनुसार, पुढील 2 दिवसांत पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेचा पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रातील काही भागांमधून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 

 

 

[ad_2]

Related posts