Groom Cancels Wedding On Last Moment In The Lure Of 50 Lakh Rupees Dowry UP; मांडव पडला, हळद लागली, अखेरच्या क्षणी वराने लग्न मोडलं, कारण ऐकून संतापाल…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गोरखपूर: घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु होती. दारात मांडव पडला होता, घरात नातेवाईकांची लगबग सुरु झाली होती. तेवढ्यात एक वाईट बातमी आली. अचानक वराने लग्नास नकार दिला. वराने अचानक अशा प्रकारे लग्न करण्यास नकार दिल्याने वधूच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोरखनाथ परिसरातील आहे. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे मदतीचे आवाहन केले आहे. वास्तविक, गोरखनाथ परिसरातील विकास नगर, बरगडवा येथील एका मुलीचे लग्न चिलुआताल भागातील राप्तीनगर येथील अरुण उपाध्याय यांचा मुलगा प्रशांत उपाध्याय याच्यासोबत निश्चित झाला होता.

दारु पिऊन झोपलेला, तिने प्रियकराला बोलावले अन्… जालना हत्या प्रकरणाचं एक-एक करुन सारं गूढ उकललं
या दोघांचा साखरपुडाही मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर १० मे रोजी त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, शेवटच्या क्षणी मुलाने लग्नास नकार दिला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, तरुणाने हुंड्याची रक्कम घेतली आणि गाडीची रक्कमही घेतली. पण, दुसऱ्या पक्षाकडून ५० लाख हुंड्याची ऑफर आल्याने त्यांनी दुसऱ्या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्न ठाकरेंच्या आमदाराच्या मुलाचं अन् घोषणाबाजी एकनाथ शिंदेंच्या नावाने, निकालानंतर काहीच

तरुणीच्या घरच्यांनी वर पक्षाचे घर गाठलं आणि लग्न मोडण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना दुसऱ्या पक्षाकडून ५० लाखांच्या हुंड्याची ऑफर आली आहे. त्यामुळे ते आता हे लग्न करु शकत नाही. त्यानंतर वधू पक्षाच्या लोकांना वर पक्षाने शीवीगाळ केली आणि त्यांना दारातून हाकलून दिलं.

त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुण प्रशांत उपाध्याय, त्याचे वडील अरुण उपाध्याय आणि आई नलिनी उपाध्याय यांच्याविरुद्ध चिलुआतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक जयंत कुमार सिंह यांनी सांगितले की, चिलुआतल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

संतापजनक! ४ वर्षांच्या चिमुकलीला बापाने गहाण ठेवलं, कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

[ad_2]

Related posts