Pakistan Pervez Musharraf Overthrew Nawaj Sharif Govt Ram Manohar Lohia Death Christopher Columbus Discovered America Today In History

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

12 October In History : भारताचा शेजारी देश पाकिस्तानच्या (Pakistan) इतिहासात 12 ऑक्टोबर हा दिवस महत्त्वाच्या आहे. 1999 साली आजच्याच दिवशी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली होती. या रक्तहीन क्रांतीमध्ये श्रीलंकेतून येणाऱ्या मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणे आणि दहशतवाद पसरवल्याचा आरोप नवाझ शरीफ यांच्यावर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. नंतर शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील 40 सदस्यांसह सौदी अरेबियाला पाठवण्यात आले.

इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे, 

1492: कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज बेटावर पोहोचला

भारताच्या शोधात निघालेल्या कोलंबसने (Christopher Columbus) आजच्याच दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबर 1492 रोजी अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवलं. त्याला आपण भारतात आल्याचं वाटलं आणि त्या ठिकाणच्या लोकांना त्याने इंडियन्स म्हणजे भारतीय असं संबोधलं. 

1922: कवयित्री शांता शेळके यांचा जन्म

मराठी कवयित्री शांता शेळके (Shanta Shelke) यांचा जन्म 12  ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला. त्यांचे शिक्षण पुण्यात  झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुगमध्ये पाच वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. शांता शेळके यांनी मराठी साहित्यात कविता, कथा, कादंबरी, चरित्र रेखाटन, मुलाखती, समीक्षण, प्रस्तावना या स्वरूपात योगदान दिले आहे. 

1967 : राम मनोहर लोहिया यांचे निधन 

भारताचे स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि प्रख्यात समाजवादी राजकारणी डॉ. राम मनोहर लोहिया (Ram Manohar Lohia) यांची आज पुण्यतिथी आहे. राम मनोहर लोहिया यांनी सार्वजनिक जीवनात समाजवादी राजकारणात अशी एक रेषा ओढली, जी आज लोहियावाद म्हणून ओळखली जाते. 23 मार्च 1910 रोजी जन्मलेल्या लोहिया यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारविरोधात आवाज उठवला. 12 ऑक्टोबर 1967 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला

1993: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना

भारताचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (National Human Rights Commission of India) ही एक स्वायत्त कायदेशीर संस्था आहे. याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी झाली. हे मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 अंतर्गत स्थापित केले गेले. हा आयोग देशातील मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्थापित करण्यात आला आहे. ही एक बहुसदस्यीय संस्था आहे. याचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा होते.

1999: जगाची लोकसंख्या सहा अब्ज झाली

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या अहवालाच्या अंदाजानुसार, आजच्याच दिवशी, 1999 साली जगाची लोकसंख्या सहा अब्जावर पोहोचली होती. त्यावेळी यूनच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोस्नियनमध्ये जन्मलेल्या मुलाला सहा अब्जावं मूलं असल्याचं जाहीर करण्यात आलं.

2002 :  इंडोनेशियात बॉम्बस्फोट, 202 जण ठार

12 ऑक्टोबर 2002 मध्ये बाली येथील दोन नाईटक्लबमध्ये दहशतवादी हल्लात 202 लोक मारले गेले. ज्यात बहुतेक परदेशी पर्यटक होते.

 

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts