Israel Palestine War Operation Ajay International Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Israel Palestine War Operation Ajay : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन्ही बाजूंनी आतापर्यंत तब्बल 2100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त आहे. अनेक भारतीयही इस्रायलमध्ये अडकले आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले की, इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. तर, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताकडून आजपासून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे.

 

इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच गोळीबार 
कोबी शोशानी यांनी सांगितले की, शनिवारी हमासने हल्ला केला तेव्हा इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. नुकतीच अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात सुखरूप परतली आहे. या हल्ल्याची सुरूवात शनिवारी झाली, जेव्हा हमासचे अतिरेकी इस्रायलमध्ये घुसले आणि लोकांना लक्ष्य करू लागले. यामुळे, अनेक दशकांत प्रथमच इस्रायल देशात मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. दोन्ही बाजूंनी 2100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, सध्याची परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी करण्यात आला आहे. आपत्कालीन क्रमांक 1800118797, +91-11 23012113, +91-11-23014104, +91-11-23017905 आणि +919968291988 आहेत. तसेच ईमेल : Situnationroom@mea.gov.in असा आहे.  इस्रायलमधील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन क्रमांक +972-35226748 आणि +972- 543278392 आहेत.

परराष्ट्रमंत्र्यांकडून ऑपरेशनची घोषणा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “इस्रायलमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात येत आहे. विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे. परदेशात राहणाऱ्या आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.” एस. जयशंकर यांच्या पोस्टवर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, ज्या भारतीय नागरिकांनी स्वतःची नोंदणी केली आहे त्यांना स्पेशल फ्लाइटसाठी मेल पाठवण्यात आला आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी इतर नोंदणीकर्त्यांना संदेश पाठवला जाईल.

सामान्य लोकांना केले लक्ष्य 

7 ऑक्टोबर रोजी सकाळी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. या काळात हमासनेही घुसखोरी केली होती आणि सामान्य लोकांना लक्ष्य केले होते. यानंतर इस्रायलने हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. एकीकडे इस्रायलकडून गाझावर सातत्याने हल्ले होत आहेत. दुसरीकडे हमासही इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागत आहे.

 

भारताने याआधीही अशी मोहीम सुरू केली होती
युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी सरकारने ऑपरेशन सुरू करण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारताने यापूर्वी आपल्या नागरिकांना युद्ध क्षेत्र, साथीचे रोग आणि नैसर्गिक आपत्तींमधून बाहेर काढले आहे. यापूर्वी भारताने युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरू केले होते. रशियन युद्धादरम्यान युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय अडकले होते, ज्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत बाहेर काढण्यात आले.

 

[ad_2]

Related posts