[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>जालना:</strong> एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच, दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता आणखीनच टोकाला पोहचला आहे. जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 14 ऑक्टोबरच्या सभेसाठी 7 कोटी रुपये कोठून आले असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. तर, आता भुजबळ यांच्या टीकेला जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहेत. "भुजबळ म्हणतात 7 कोटी कोठून आले. त्यांना कोणी सांगितले 7 कोटी जमा झाल्याच. त्याला (भुजबळांना) पाहिजे का दोन एक हजार रुपये डिझेल टाकायला,” असे प्रत्युत्तर जरांगे यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता यावरून मराठा-OBC वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. </p>
[ad_2]