Weather Update Today Imd Forecast Maharashtra Mumbai Delhi Uttar Pradesh Uttarakhand Monsoon Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update Today : आज शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2023) सुरुवात होत असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यासह देशभरात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 48 महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशासह राज्यातूल अनेक भागातून मान्सूनने माघारी घेतली असल्याने तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पावसामुळे देशभरातील काही भागांना दिलासा मिळणार आहे. 

कुठे ऊन, कुठे पाऊस

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असताना देशाच्या अनेक भागात अजूनही पाऊस बरसताना पाहायला मिळत आहे. यासोबतच काही भागांत तापमन वाढीमुळे अनेक ठिकाणी उन्हाची झळ जाणवत आहे. सध्या दिल्लीत हवामान बदलताना दिसत आहे. सकाळी गुलाबी थंडी जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घट होण्याचाही अंदाज आहे.

देशाच्या ‘या’ भागांत पावसाची शक्यता

उत्तर प्रदेशमध्येही थंडीची चाहून लागल्याचं चित्र दिसून येत आहे. गुजरात, राजस्थानसह उत्तर प्रदेशातून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशासह, उत्तराखंडमध्येही पहाटे गुलाबी थंडी पडताना दिसत आहे. आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस

महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाचा अंदाज

राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्याने देशासह राज्यात काही भागांत पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तासांत कोकणसह काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी कोकण किनारपट्टी भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता झाली आहे. याशिवाय पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



[ad_2]

Related posts