Govt Declares August 23 As National Space Day To Commemorate Success Of Chandrayaan-3 Mission

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ISRO Lunar Mission : इस्रो (ISRO) च्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे चंद्रावर (ISRO Moon Misson) यशस्वी लँडिंग करत भारतानं नवा इतिहास रचला. भारताचं चांद्रयान-3 (ISRO Chandrayaan-3) 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं. आता इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव म्हणून 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून केंद्र सरकारकडून 13 ऑक्टोबरला अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश

चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्ताने इस्रोच्या शास्रज्ञांचं अभिनंदन करत मोठी घोषणा केली होती. दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असं पंतप्रधान मोदींनी 26 ऑगस्ट रोजी सांगितलं होतं. आता केंद्र सरकारकडून 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

23 ऑगस्ट ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’

23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. यश साजरं करण्यासाठी आणि या ऐतिहासिक कामगिरीची आठवण म्हणून केंद्र सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून घोषित करत 13 ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला.

Israel Hamas War L

केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

केंद्र सरकारने गॅझेट अधिसूचनेत म्हटलं आहे की, “23 ऑगस्ट हा देशाच्या अंतराळ मोहिमांमधील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, तरुण पिढ्यांना  देते. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वीतेसह विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर तैनात केल्यामुळे, भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार पहिला देश. या ऐतिहासिक मोहिमेचा परिणाम मानवजातीला पुढील काही वर्षांमध्ये लाभदायक ठरेल. हा दिवस देशाच्या अंतराळ मोहिमांमधील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा तरुण पिढ्यांना यातील वाढीव आवड निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो. STEM म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचा पाठपुरावा करण्यासाठी वाढीव स्वारस्यासाठी प्रेरित करते आणि अंतराळात क्षेत्रात मोठी प्रेरणा आणि मोठी चालना देतो. या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस “राष्ट्रीय अंतराळ दिन” म्हणून घोषित केला आहे.” 

महत्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts