Accident On Samriddhi Highway Condolences From Devendra Fadnavis

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samriddhi Highway Accident : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 23 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही ट्वीट…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देखील ट्वीट करत छत्रपती संभाजीनगरच्या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. तर अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50  हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Samriddhi Highway Accident : आरटीओने ट्रक अडवला अन् चालकाने ब्रेक मारला, समृद्धीवरील अपघाताची धक्कादायक माहिती आली समोर



[ad_2]

Related posts