India Made In India Light Combat Aircraft Mark 1A To Be Equipped With Indigenous Systems

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IAF LCA Mark 1A Fighter Jet : आता भारताचं लष्करी सामर्थ्य आणखी वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मार्क 1A लढाऊ विमानांमध्ये (Mark 1A Fighter Jets) नवीन विकसित प्रणाली सामील करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या LCA मार्क 1A लढाऊ विमानामध्ये (Light Combat Aircraft) ‘उत्तम’ आणि ‘अंगद’ या दोन नवीन प्रणाली समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय बनावटीचं हलक्या वजनाचं लढाऊ विमान अधिक सुसज्ज यंत्रणांनी शत्रूला सामोरं जाण्यास सज्ज असेल. 

स्वदेशी LCA मार्क 1A लढाऊ विमान यंत्रणांनी सुसज्ज

स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मार्क 1A लढाऊ विमानामध्ये (Mark 1A Fighter Jets) ‘उत्तम’ रडार (Uttam Radar) आणि ‘अंगद’ (Angad) इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर संच (Electronic Warfare Suite) हे विकसित तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. उत्तम अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर संच या प्रणाली सध्या विकासित टप्प्यात आहेत. या प्रणाली लवकरच LCA मार्क 1A लढाऊ विमानांमध्ये सामील केल्या जातील, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

‘उत्तम’ आणि ‘अंगद’ वाढणार ताकद 

केंद्र सरकार लष्करी सामर्थ्य वाढवण्यासोबतच त्यामध्ये स्वदेशीकरणाच्या दिशेनेही वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दृष्टीने लष्करात स्वदेशी बनावटीची विमाने आणि क्षेपणास्र सामील करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. भारतीय वायुसेना (IAF) ‘मेड इन इंडिया’ (Made in India) लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मार्क 1A लढाऊ विमानांमध्ये ‘उत्तम’ रडार आणि ‘अंगद’ इलेक्ट्रॉनिक युद्ध संच प्रणालीने सुसज्ज आहे. भारतीय हवाई दल (IAF) मध्ये आधीच 83 LCA मार्क 1A लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यात आणखी 97 LCA फायटर जेट हवाई दलात सामील करण्याची योजना आहे. 

स्वदेशी विकसित प्रणाली वाढवणार सामर्थ्य

लष्करी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात तयार करण्यात आलेल्या ‘मार्क 1 ए’ या हलक्या लढाऊ विमानात प्रथम ‘उत्तम’ रडार आणि ‘अंगद’ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट बसवण्यात येणार आहे. उत्तम अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले अॅरे रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट स्वदेशी पद्धतीने विकसित केले जात असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतीय वायू दलात 180 LCA विमाने

भारतीय हवाई दलाने 83 ‘LCA मार्क-1A’ साठी करार केला होता. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वायू दलात आणखी 97 विमाने सामील होणार आहेत. त्यानंतर, भारतीय वायूसेनेतील LCA मार्क-1A’ विमानांची संख्या 180 असेल. 

[ad_2]

Related posts