Woman Farmer Annually Earning 6 To 7 Lakh From Farming Bhojpur District Farmer Success Story Bihar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Success Story: आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. राजकारण, समाजकारण, शेती, व्यवसाय, नोकरी या सर्व क्षेत्रात महिला चांगल काम करत आहेत. अशाच एका बिहारमधील महिला शेतकऱ्याने आपल्या शेतीत चांगले प्रयोग केले आहेत. शेतीच्या बळावर या महिलेनं  स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील विद्याराणी सिंह या महिला शेतकरी शेतीतून वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांचे  उत्पन्न कमवत आहेत. ट्रॅक्टर चालवण्यापासून इतर सर्व कामे त्या स्वतः ता करतात. त्यांची प्रेरणा घेऊन अनेक महिलांनी शेती सुरू केली असून, त्यांचे उत्पन्न वाढले आहेत. त्यांच्या नवऱ्याने शेती करण्यास नकार दिला होता. त्यानंतर विद्याराणी सिंह यांनी चांगल्या पद्धतीनं शेती करत नाव मिळवले आहे.   

भरडधान्य, भाजीपाला, मत्स्यपालन, पशुपालनातून मिळवला नफा

विद्याराणी सिंह या भरडधान्य, भाजीपाला, मत्स्यपालन, पशुपालन यासह पारंपारिक पिकांच्या लागवडीतून चांगली कमाई करत आहे. याशिवाय त्या इतर महिलांनाही शेतीचं प्रशिक्षण देत आहेत. भोजपूर जिल्ह्यातील कोइलवार ब्लॉकमधील खेसरहिया गावात राहणाऱ्या विद्याराणी सिंह सुमारे 11 एकर जमिनीत शेती करतात. पूर्वी त्यांचे पती शेती करायचे, पण त्यानंतर त्यांनी शेती सोडली. मग विद्याराणी यांनी त्यांच्या शेतातून धान्य पिकवायचे ठरवले. 23 वर्षांपूर्वी त्यांनी शेती करायला सुरुवात केली होती. त्या  गेल्या दोन वर्षांपासून भरड धान्याची लागवड करत आहेत. त्यामधून त्यांना वर्षाला सुमारे सहा ते सात लाख रुपये मिळत आहेत.

शेततळे असतानाही बाजारातून धान्य आणावे लागत होते.

शेतकऱ्याशी संवाद साधताना विद्याराणी सिंह सांगतात की, शेतीत येण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. सासू, सासरे यांच्या निधनानंतर घरातील शेती थांबली होती. पती व्यवसायानं वकील असल्याने त्यांना शेतीत जास्त वेळ देता आला नाही. त्यामुळं भाजीपाल्यापासून धान्यापर्यंत सर्वच वस्तू बाजारातून आणाव्या लागल्या. तरीही चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध झाले नाही. या सर्व अडचणी पाहून त्यांनी 2000 साली शेती करण्यास सुरुवात केली. आज ती गेल्या दोन वर्षांपासून आपल्या शेतात भात, मका, गहू, बाजरी, ज्वारी, मका, ऊस, मासे, पशुपालन आणि भाजीपाला यासह भरड धान्याची लागवड करत आहे. यातून ती वर्षाला सहा ते सात लाख कमवत आहे. ती म्हणते की, जर शेती मनापासून केली तर तुमच्या कमाईचा मार्ग खुला होईल. 

विद्याराणी सिंह यांची कामामुळं ओळख 

कोइलवार ब्लॉकच्या खेसरहिया गावातील चंद्र प्रकाश सिंह यांच्या 56 वर्षीय पत्नी विद्याराणी सिंह या त्यांच्या कामांमुळे ओळखल्या जात आहेत. याचाच परिणाम म्हणून त्यांना शेतीशी संबंधित अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विद्याराणी या स्वतः ट्रॅक्टरने शेत नांगरतात. त्या शेतीसाठी इतर लोकांवर अवलंबून राहत नाहीत. आता त्यांची मुलेही त्यांना शेतीत मदत करत आहेत. याशिवाय गावातील इतर महिलांवरही त्यांचा प्रभाव पडला आहे. त्या महिला शेतीत रस दाखवू लागल्या आहेत.  लग्नानंतर विद्याराणी सिंह यांनी केवळ शेतीच केली नाही तर मॅट्रिक, इंटरमिजिएट आणि ग्रॅज्युएशनही पूर्ण केले आहे. आज विद्याराणी गावातील इतर महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

प्रयत्न करुनही नोकरी मिळाली नाही, शेवटी घेतला ‘हा’ निर्णय; आज कमावतोय लाखोंचा नफा

[ad_2]

Related posts