Facts: सैन्याचं प्रशिक्षण घेऊन भारताच्या 'या' शहरात येतात इस्रायली ज्यू; जाणून घ्या कारण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Israel: इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायली सैनिकांनी संपूर्ण गाझा पट्टी कव्हर केली आहे. या युद्धासाठी इस्रायलने विविध देशांत गेलेल्या त्यांच्या ज्यू (Jew) बांधवांना आणि सैनिकांना माघारी बोलावलं असल्याचं बोललं जात आहे. भारत भेटीसाठी आलेले ज्यू देखील आता आपल्या मायदेशी परतत आहेत, यामुळे भारतातील एक शहर रिकामं होऊ लागलं आहे आणि हे शहर हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) आहे. आता भारतातील या शहराबद्दल आणि इस्त्रायलशी असलेल्या त्याच्या संबंधांबद्दल जाणून घेऊया.

कोणतं आहे हे शहर?

तर हे शहर आहे, हिमाचल प्रदेशातील धर्मशाला. या शहराचा खास भाग असलेल्या धरमकोटमध्ये इस्रायली लोक येतात. इथे दरवर्षी इस्त्रायलींचा मेळा भरतो. विशेषत: इस्रायली तरुण दरवर्षी येथे येतात आणि बराच वेळ घालवतात. धरमकोटमध्ये एक खबाद हाऊस देखील आहे, जिथे इस्रायली लोक प्रार्थना करतात आणि त्यांच्या देवाचं स्मरण करतात.

सैन्य प्रशिक्षणानंतर इस्रायली लोक इथे का येतात?

इस्रायलमधील प्रत्येक व्यक्तीसाठी सैन्य प्रशिक्षण आवश्यक आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुण हिमाचल प्रदेशातील या छोट्याशा ठिकाणी येतात आणि अनेक दिवस आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांती देतात. मात्र, यावेळी हमासच्या हल्ल्याने त्यांची विश्रांती भंग केली आहे आणि भारतात असलेल्या इस्रायली लोकांना मायदेशी परतावं लागलं आहे.

या ठिकाणीही येतात इस्त्रायली

धर्मकोटसोबतच भारतात येणारे इस्रायली दिल्लीतील पहाडगंज आणि राजस्थानमधील अजमेरलाही भेट देतात. वास्तविक या दोन्ही ठिकाणी इस्रायली लोकांची धार्मिक स्थळं, म्हणजेच खबाद हाऊस आहेत. इस्त्रायली लोक येथे जाऊन प्रार्थना करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ज्यूंचं हे धार्मिक स्थळ जवळपास प्रत्येक देशात आहे. या धार्मिक स्थळ असलेल्या शहरांत नेहमी काही ज्यू स्थायिक असतात.

इस्रायल सैन्य गाझावर हल्ल्याच्या तयारीत

गाझामध्ये घुसून हमासचं अस्तित्व मिटवण्याची इस्रायली सैन्याची योजना आहे. यासाठी गाझा सीमेवर लाखो इस्रायली सैनिक तैनात आहेत. इस्रायल लष्कर रणगाडे, चिलखती वाहने, क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेसह सुमारे 3 लाख सैनिक गाझा सीमेवर उपस्थित आहेत. इस्रायली सैनिकांसमोर हमासचा खात्मा करण्याचं उद्दिष्ट आहे. इस्रायल सरकारचा आदेश मिळताच इस्रायल लष्कर गाझामध्ये शिरून हमासवर थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर इस्रायलचे नौदलही समुद्रात हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा:

Israel Palestine War : इस्रायल-हमास युद्धात 5 तासांचा युद्धविराम, संघर्षात आतापर्यंत 4000 हून अधिक बळी

[ad_2]

Related posts