How To Work From Traffic Camera And E-challan Generate Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

How Traffic Camera Works: तुम्ही स्वत:ला सिव्हिल सोसायटीचा भाग समजत असाल, तर तुम्हाला काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. एखाद्या रस्त्यावरून चालत असतानाही काही नियम आहेत. त्याचं योग्य पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. समजा, तुम्ही जर मुंबई, पुणे आणि  दिल्ली यासारख्या मेट्रो शहरात राहत असाल, तर प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा कॅमेरे बसवलेले असतात. त्यामुळे कोणताही व्यक्ती ट्रॅफिक सिग्नल तोडून वेगानं पुढे निघून गेला, तर ट्रॅफिक कॅमेरे ऑटोमॅटिक चलन तयार करतं आणि तो व्यक्ती राहत असलेल्या घरच्या पत्त्यावर हे चलन पाठवून देतं. यामुळे वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे नियमानुसार दंड भरावा लागतो. मेट्रो शहरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण ट्रॅफिक कॅमेऱ्याची काम करण्याची (How Traffic Camera Works) पद्धत थोडी वेगळी असते. जी व्यक्ती वाहतूक नियमांच उल्लंघन करेल त्यांची सुटका होणं शक्य नाही.  याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

ट्रॅफिक कॅमेरा असं करतो काम

वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींची नेमकी ओळख पटावी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा कॅमेर बसवलेले असतात. हे कॅमरे 2 मेगापिक्सल आणि उच्च रिझोल्यूशनचे असतात. तसेच, हे कॅमरे 60 डिग्रीपर्यंतचं वळण घेऊन परिसर कव्हर करू शकतो. यामुळे तुम्ही जर वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं, तर कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटका होणं खूप अवघड असतं. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहनांचा वेगाची माहिती समजतं.

डेटा सुरक्षित ठेवला जातो

वाहतुकीवर लक्ष ठेवून असणाऱ्या कॅमेऱ्याला ‘ट्रॅफिक कंट्रोल रूम’वरून ऑपरेट केलं जातं. यासाठी एक विशेष डेटा एन्क्रिप्ट सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. तसेच, कॅमऱ्याच्या माध्यमातून घेण्यात आलेले छायाचित्र आणि व्हिडीओज  पुरावे म्हणून सुरक्षित ठेवले जातात. याचं कारण काही मोठा वाद निर्माण झाला, तर या पुराव्यांना कोर्टासमोर सादर केलं जातं. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून डेटाची पूर्ण काळजी घेतली जाते. 

असं पाठवलं जातं घरी चलन

समजा, एखाद्या व्यक्तीनं वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं, तर ‘ट्रॅफिक कंट्रोल रूम’कडून तुमच्या मोबाईलवर एका एसएमएसद्वारे ई-चलन पाठवतात. याचा अर्थ, तुम्हाला दंड भरावा लागतो. जर दिलेल्या वेळेत दंडाची रक्कम भरण्यात आली नाही, तर तुमच्या वाहनाची जप्ती केली जाऊ शकते.’ट्रॅफिक कंट्रोल रूम’चं कार्यालय 24×7 तास  सक्रिय असतं. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या वेळीही हे ट्रॅफिक कॅमेरे सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी नियमाचं उल्लंघन केलं, तरी दंड भरावा लागतो. 

ट्रॅफिक कॅमेरा आहे अत्यंत अचूक

तुम्ही वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे तुम्हाला ई-चलन पाठवलं जातं. पण यासाठी सर्वप्रथम दोन टप्प्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं. यामध्ये सर्वप्रथम स्वयंचलित पद्धतीनं माहितीची खात्री केली जाते. यामुळे तुम्ही खरंच वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं आहे की नाही?  याची माहिती होते. या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर मॅन्युअली पद्धतीनं तपासलं जातं. त्यामुळे या कॅमेऱ्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही.

[ad_2]

Related posts